आता इंटरनेटशिवायही करु शकता तुम्ही गुगल मॅपचा वापर

HIGHLIGHTS

आपण नेटशिवायही गुगल मॅप वापरु शकता. तुम्ही आधीपासूनच माहित आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

आता इंटरनेटशिवायही करु शकता तुम्ही गुगल मॅपचा वापर

आज आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर आपण गुगलचा वापर करता. आता गुगल न केवळ एक सर्च इंजिन राहिला असून तो सर्व तरुणाईचा गुगल बाबा झाला आहे. कारण तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान गुगलवर अगदी सहजपणे मिळते. तसेच जर तुम्हाला कोणत्या ठिकाणाविषयी माहिती हवी असेल तर, आपण गुगल मॅपवर जाता, जेथे तुम्हाला जगातील कोणत्याही ठिकाणाची माहिती अगदी क्षणार्धात मिळते.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

मात्र त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे, बरोबर ना! पण जर इंटरनेट नसेल आणि आपल्याला काहीही पैसे मोजावे लागणार नाही आणि सहजरित्या तुम्हाला ती माहिती मिळेल तर कसे वाटेल? विश्वास बसत नाही ना, पण हे खरे आहे. आता आपण गुगल मॅपला ऑफलाईनसुद्धा वापरु शकता. त्याचबरोबर ह्याच्या मदतीने आपण कस्टम मॅप बनवू शकता आणि त्याला स्मार्टफोनच्या गुगल ड्राइव किंवा कंम्प्यूटर मध्ये सेव्ह करु शकता. चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर

त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या आयओएस किंवा अॅनड्रॉईड बाजारात जावे लागेल. त्यानंतर आपल्याला आपला गुगल मॅप अपडेट करावे लागेल. ते अपडेट तपासा. जेव्हा तुम्हाला ह्याचे लेटेस्ट व्हर्जन मिळेल किंवा जेव्हा हा पुर्णपणे अपडेट होईल, तेव्हा आपल्याला ज्या ठिकाणाला ऑफलाइन बघायचे आहे किंवा ज्या ठिकाणी हा वापरायचा आहे, त्यासाठी सर्च करा. त्यानंतर गुगल आपल्याला त्या स्थानावर दिसेल, जिथे आपल्याला जायचे आहे. आता आपल्याला आपल्या स्क्रीनच्या खालच्या बाजूस त्या ठिकाणाचे नाव दिसेल, आपल्याला त्या नावावर टॅप करावे लागेल. त्यानंतर वर उजव्या बाजूला कोप-यात दिसत असलेल्या तीन डॉट आयकॉनवर टॅप करा. आणि त्यानंतर सेव्ह ऑफलाइन मॅपला सिलेक्ट कार.

आता आपण त्या ठिकाणाबद्दल इंटरनेटशिवाय माहिती मिळवू शकता. आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo