शेतकरी मित्रांनो! PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? ‘अशा’प्रकारे करा रजिस्ट्रेशन
PM किसान योजनेअंतर्गत शेतकाऱ्यांना सरकारकडून मिळते आर्थिक मदत
योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिकरीत्या मदत करते.
PM किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची सोपी प्रक्रिया
शेतकरी मित्रांसाठी आता सरकार अनेक नवनवीन योजना राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे प्रसिद्ध PM किसान योजना होय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच PM Kisan योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिकरीत्या मदत करते. याअंतर्गत, दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये ट्रान्सफर केले जातात.
Surveyआम्ही तुम्हाला सांगतो की, अवलानुसार महाराष्ट्रात PM किसान योजनेचा लाभार्थ्यांची संख्या 91,51,365 इतकी आहे. जर तुम्हाला PM किसान लाभार्थी यादीतील नाव तपासायचे असेल किंवा पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर पूढील प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा:
PM किसान लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? तपासण्याची प्रक्रिया
तुमचे नाव PM किसान योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही? हे तुम्ही सहजपणे ऑनलाइन तपासू शकता. पहा प्रक्रिया-
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत सरकारी वेबसाइट www.pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
- साइट ओपन केल्यानंतर होम पेजच्या बॉटमला असलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा.
- फार्मर्स कॉर्नरमध्ये तुम्हाला ‘Beneficiary List’ म्हणजेच लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला माहिती प्रविष्ट करावी लागेल. ज्यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव हे डिटेल्स काळजीपूर्वक प्रविष्ट करा.
- यानंतर ‘Get Report’ वर क्लिक करा आणि तुम्हाला संपूर्ण यादी मिळेल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव आहे की नाही ते तपासून घेऊ शकता.
PM किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची सोपी प्रक्रिया
पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्स पहा:
- अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ओपन करा. यानंतर ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला ‘Rural Farmer Registration’ आणि ‘Urban Farmer Registration’ चा पर्याय मिळेल. तुमच्या क्षेत्रानुसार यापैकी पर्याय निवडा.
- आता तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक, राज्याचे नाव निवडल्यानंतर, कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- यानंतर Get OTP वर टॅप करा आणि OTP येईल, तो प्रविष्ट करा. नोंदणीसाठी प्रमाणीकरण फक्त Aadhaar द्वारे केले जाईल.
- पुढे यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील. डेटा क्रॉस-चेक करण्यासाठी डिपॉझिट की वर क्लिक करा.
- अखेर ‘Apply’ बटनवर क्लिक करा. अर्ज केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी या कागदपत्राची प्रिंट घायला विसरू नका.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile