How to: फॉरेन टूअर प्लॅन करताय? ‘अशा’प्रकारे ऍक्टिव्ह करा तुमच्या फोनमध्ये UPI International सर्व्हिस। Tech News 

How to: फॉरेन टूअर प्लॅन करताय? ‘अशा’प्रकारे ऍक्टिव्ह करा तुमच्या फोनमध्ये UPI International सर्व्हिस। Tech News 
HIGHLIGHTS

UPI सर्व्हिस आता भारताव्यतिरिक्त ही सेवा इतर 7 इतर देशांमध्येही उपलब्ध

UPI इंटरनॅशनलच्या माध्यमातून तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंतचे ऑनलाइन व्यवहार करता येईल.

स्मार्टफोनमध्ये असलेल्या UPI ॲपमध्ये UPI International सर्व्हिस ऍक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया

युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच प्रसिद्ध UPI सर्व्हिस आता भारताव्यतिरिक्त ही सेवा इतर 7 इतर देशांमध्येही उपलब्ध झाली आहे. होय, या यादीत श्रीलंका, मॉरिशस, भूतान, ओमान, नेपाळ, फ्रान्स आणि UAE या देशांचा समावेश आहे. म्हणजेच आता भारतीय वापरकर्ते परदेशातही UPI द्वारे ऑनलाइन व्यवहार करू शकतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये उपलब्ध असलेल्या या सेवेला UPI International म्हटले जात आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI फ्रेमवर्कसह दोन सीमांमधील रिअल-टाइम करंसी एक्सचेंजसाठी या देशांशी सहयोग केले आहे.

जर तुम्ही वर सांगितलेल्या श्रीलंका, मॉरिशस, भूतान, ओमान, नेपाळ, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या कोणत्याही देशात जाण्याचे प्लॅन करताय तर, हा लेख विशेषतः तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या रिपोर्टमध्य आम्ही तुम्हाला येथे UPI इंटरनॅशनल वापरण्याबाबत माहिती देणार आहोत.

GPay मध्ये UPI International सर्व्हिस कशी ऍक्टिव्ह कराल?

महत्त्वाचे लक्षात घ्या की, UPI इंटरनॅशनलच्या माध्यमातून तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंतचे ऑनलाइन व्यवहार करू शकता. अशा परिस्थितीत परदेशात जाण्यापूर्वी तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या UPI ॲपमध्ये ही सेवा कशी सक्रिय करावी. जाणून घ्या स्टेप बाय स्टेप:

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Google Pay ॲप ओपन करून वरच्या कोपऱ्यातील प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता ‘Bank account’ वर जा आणि तुम्हाला ज्या खात्यातून आंतरराष्ट्रीय UPI व्यवहार करायचे आहेत ते अकाउंट सिलेक्ट करा.
  • आता ‘मॅनेज इंटरनॅशनल पेमेंट्स’ वर जा आणि या ऑप्शनवर टॉगल ऑन करा.
  • तुमच्या खात्यावर UPI आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करण्यासाठी, तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल.
  • अशाप्रकारे तुमच्या खात्यावर 90 दिवसांसाठी UPI सेवा ऍक्टिव्ह होईल.
UPI international  PAYMENT

PhonePe मध्ये UPI International कसे सक्रिय करावे?

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमधील PhonePe ॲप ओपन करा. आता प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करून खाली स्क्रोल करा.
  • आता तुम्हाला पेमेंट मॅनेजमेंट मेनू विभागात ‘आंतरराष्ट्रीय’ पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर Payment Management menu सेक्शनमधून ‘International’ ऑप्शन सिलेक्ट करा.
  • तुम्हाला ज्या खात्यातून आंतरराष्ट्रीय UPI व्यवहार करायचे आहेत ते खाते निवडा.
  • आता तुम्हाला ‘Activate’ ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता UPI पिन टाका आणि अशाप्रकारे UPI International सर्व्हिस ऑन करा.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo