Holikadahan 2025: या होळीला दुष्ट प्रवृत्तींचा करूयात नाश! अप्रतिम शुभेच्छांसह प्रियजनांचा दिवस बनवुयात खास

Holikadahan 2025: या होळीला दुष्ट प्रवृत्तींचा करूयात नाश! अप्रतिम शुभेच्छांसह प्रियजनांचा दिवस बनवुयात खास
HIGHLIGHTS

आज 13 मार्च 2025 रोजी Holikadahan 2025 सण आहे.

होलिकादहन करून 'वाईटावर चांगल्याचे विजय नेहमीच होते', असा संदेश दिला जातो.

WhatsApp वर होलिकादहनचे शुभेच्छा पाठवून प्रियजनांना अप्रतिम संदेश द्या.

Holikadahan 2025: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र होळीच्या सणाची चर्चा आणि तयार सुरु होती. बाजारपेठ सणाच्या अनेक वस्तुंनी म्हणजेच रंग, गुलाल आणि पिचकाऱ्यांनी सजलेली आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, धुलीवंदनाच्या एक दिवस आधी होलिकादहन असते. आज 13 मार्च 2025 रोजी होलिकादहन आहे. या दिवशी होलिकादहन करून ‘वाईटावर चांगल्याचे विजय नेहमीच होते’, असा संदेश दिला जातो. या दिवशी रात्रीला मोठी शेकोटी पेटवून विधिवत पूजा केली जाते.

Also Read: Amazon Holi Store: लेटेस्ट आणि आकर्षक 5G स्मार्टफोन्सवर जबरदस्त Discount, पहा ऑफर्स

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला नेहमीच वाईटावर चांगल्याची मात होते, याबद्दल अनेक संदेश देणार आहोत. WhatsApp वर होलिकादहनचे शुभेच्छा पाठवून प्रियजनांना अप्रतिम संदेश द्या.

Holikadahan 2025 Wishes

  • तुमचे जीवन आनंद आणि समृद्धीच्या सुंदर रंगांनी रंगले जावो, होलिका दहनाच्या शुभेच्छा!
  • ही होलिका दहन तुमच्या जीवनातुन सर्व वाईट गोष्टी काढून तुमचे जीवन आनंदाने आणि हास्याने समृद्ध करो. तुम्हाला होळीच्या शुभेच्छा!
  • होलिका दहनात तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे जळून खाक होतील आणि तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच राहील, होलिका दहन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Holikadahan 2025
  • चांगल्याचा विजय आणि वाईटाचा पराभव झाला आहे. होलिकेचे दहन पहा, आज तो शुभ क्षण आला आहे!
  • होलिका ज्या प्रकारे जळून राख झाली, तसेच, तुमच्या आयुष्यातूनही सर्व वेदना, दुःख आणि पाप जाळून जावोत.
    होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • चला आपण सर्व एकत्र येऊन होळीच्या अग्नीत आपल्या मनातील सर्व वाईट आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करूयात.
    होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • या होळीला तुमचे बेरंग आयुष्य परत एकदा रंगांनी समृष्ट होवो. होळीच्या भरभरून शुभेच्छा!
  • होळीचा हा सण तुमच्या वाईट दिवसांचा संपूर्ण नाश करो, आजपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होवो. होलिकादहनच्या शुभेच्छा!

WhatsApp वर स्टेटस ठेवण्यासाठी व्हीडिओ डाउनलोड करा.

सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या Holikadahan 2025 च्या व्हीडिओची लिंक कॉपी करा.

  • त्यानंतर गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड असे सर्च करा.
  • आता तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स मिळतील.
  • तयातील एखादी योग्य साईट निवडून ओपन करा आणि तुम्ही सिलेक्ट केलेल्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा.

या अगदी सोप्या प्रक्रियेने तुम्ही व्हीडिओ अगदी मोफत डाउनलोड करू शकता. हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स सेक्शनमध्ये किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo