Happy Gudi Padwa Wishes 2025: आनंदाची गुढी उभारा दारी! प्रियजनांना WhatsApp नववर्षाच्या द्या अप्रतिम शुभेच्छा 

HIGHLIGHTS

'गुढी पाडवा' हा मराठी संस्कृतीत महत्त्वाचा सण आहे.

महत्त्वाचे म्हणजे गुढी पाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते.

WhatsApp द्वारे गुढी पाडव्याच्या द्या शुभेच्छा, मेटा AI द्वारे तयार करा इमेजेस आणि स्टिकर्स

Happy Gudi Padwa Wishes 2025: आनंदाची गुढी उभारा दारी! प्रियजनांना WhatsApp नववर्षाच्या द्या अप्रतिम शुभेच्छा 

Happy Gudi Padwa Wishes 2025: ‘गुढी पाडवा’ हा मराठी संस्कृतीत महत्त्वाचा सण आहे. गुढी पाडवा आपल्या साडे-तीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त होय. महत्त्वाचे म्हणजे गुढी पाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची विधिवतपणे पूजा केली जाते. या सणाला सर्व मराठी बांधव एकमेकांना शुभेच्छा देऊन नववर्षाचे स्वागत करतात. WhatsApp द्वारे गुढी पाडव्याच्या द्या पुढीलप्रमाणे अप्रतिम शुभेच्छा-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Chaitra Navratri 2025: प्रियजनांना WhatsApp द्वारे द्या नवरात्रीच्या शुभेच्छा! अशाप्रकारे डाउनलोड करा स्टेटससाठी Video

Happy Gudi Padwa Wishes 2025 in Marathi

  • वसंताची पाहत घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा!
  • हे नववर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • गुढी उभारून दारी, आनंद साजरा करू घरी! तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • नक्षीदार काठीवर, रेशमी वस्त्र, त्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया गुढी पाडवा!
  • गुढीपाडवा तुमच्यासाठी आनंद, उत्साह आणि नवीन संधी घेऊन येवो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • नवे वर्ष, नव्या संकल्पाचे, नव्या स्वप्नांचे, नव्या यशाचे, गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • सोनेरी पाहत, उंच गुढीचा वेगळाच थाट, आनंदाची उधळण आणि सुखाची बरसात, गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • उभारून आनंदाची गुढी, तुमच्या जीवनात येऊ रंगत न्यारी, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!
  • पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी मंगलमय होवो घर सारे, गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
  • पाडव्याची नवीन पहाट, घेऊन येवो तुमच्या जीवनात सुखाची लाट, गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा!
Happy Gudi Padwa Wishes 2025 in Marathi

मेटा AI द्वारे तयार करा इमेजेस आणि स्टिकर्स

WhatsApp वर उपलब्ध Meta AI फीचरद्वारे Happy Gudi Padwa Wishes 2025 तुम्ही बनवू शकता. यासाठी यावर तुम्हाला केवळ कमांड द्यावी लागेल. पहा प्रक्रिया-

  • तुमच्या डिव्हाइसमध्ये WhatsApp ओपन करा. होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला Meta AI चा ब्लु आयकॉन दिसेल.
  • ब्लु आयकॉनवर क्लिक करा. मग तुम्ही Meta AI ला कमांड द्या. उदा. Happy Gudi Padwa Wishes 2025
  • आता Meta AI एक फोटो तयार करेल आणि तुम्हाला देईल. तुम्ही Meta AI ला कमांड देऊन हे Happy Gudi Padwa Wishes 2025 इमेजेस कस्टमाइज करून घेऊ शकता.

वरील समान प्रक्रिया तुम्ही स्टिकर्ससाठी देखील फॉलो करू शकता. हे फोटोज आणि स्टिकर्स प्रियजनांना पाठवून तुम्ही गुढी पाडव्याच्या प्रतिमा शुभेच्छा द्या. Happy Gudi Padwa Wishes 2025 च्या सर्व मराठी बांधवांना ‘डिजिट मराठी’ कडून हार्दिक शुभेच्छा!

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo