Pension Scam: अरे देवा! सायबर गुन्हेगार पेन्शन घोटाळ्याद्वारे करतात फसवणूक, ‘अशा’ प्रकारे ठेवा स्वतःला सुरक्षित 

HIGHLIGHTS

आता सायबर गुन्हेगार देखील फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत.

सायबर हॅकर्स Pension Scam द्वारे लोकांना फसवत असल्याचे सरकारने इशारा दिला आहे.

Pension Scam साठी सायबर घोटाळेबाज WhatsApp च्या माध्यमातून लोकांना संदेश पाठवतात.

Pension Scam: अरे देवा! सायबर गुन्हेगार पेन्शन घोटाळ्याद्वारे करतात फसवणूक, ‘अशा’ प्रकारे ठेवा स्वतःला सुरक्षित 

Pension Scam: सायबर प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे लोक आता याबद्दल अधिक सतर्क झाले आहेत. त्यामुळे आता सायबर गुन्हेगार देखील फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. दरम्यान, सायबर स्कॅम्सच्या नव्या पद्धतीबाबत सरकारने लोकांना सतर्क केले आहे. सायबर हॅकर्स Pension Scam द्वारे लोकांना फसवत असल्याचे सरकारने इशारा दिला आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

तुमच्या जीवन सन्मान प्रमाणपत्राची वार्षिक तारीख जवळ आली आहे, असे सांगून घोटाळेबाज WhatsApp च्या माध्यमातून लोकांना आमिष दाखवतात. अशा स्थितीत त्याचे लवकरच नूतनीकरण करावे लागेल, अन्यथा निवृत्ती वेतनापासून म्हणजेच पेन्शनपासून वंचित राहावे लागेल, असे सांगून सामान्य जनतेची फसवणूक केली जाते.

Also Read: Tech Tips: Smartphone ला आग लागण्याची ‘ही’ आहेत मुख्य कारणे, जाणून घ्या बचाव करण्याचे उपाय

पेन्शन स्कॅम कसा होत आहे?

पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ‘जीवन सन्मान प्रमाणपत्र’ आवश्यक असतो. सायबर घोटाळेबाज याच गोष्टीचा लाभ घेत WhatsApp च्या माध्यमातून लोकांना संदेश पाठवतात की, “तुम्हाला भविष्यात पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा. अन्यथा तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणार नाही.” सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस म्हणजेच CPAO नुसार, असे मेसेज लोकांना WhatsApp द्वारे पाठवले जातात आणि नंतर त्यांना पेन्शन बंद करण्याची भीती दाखवली जाते.

pension scam alert

हे घोटाळेबाज लोकांना सांगतात, की तुमच्या जीवन सन्मान प्रमाणपत्राची शेवटची तारीख जवळ आली आहे आणि आता ती जुनी झाली आहे. अशा परिस्थितीत जीवन प्रमाण प्रमाणपत्र अपडेट करावे लागेल. यानंतर लोक सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या बोलण्यात अडकून वैयक्तिक माहिती आणि बँकिंग डिटेल्स सायबर गुन्हेगारांना देतात, अशाप्रकारे लोकांची फसवणूक केली जाते.

स्वतःला अशाप्रकारे सुरक्षित ठेवा.

पेन्शन घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी, सोशल मीडियाद्वारे प्राप्त झालेल्या कोणत्याही अज्ञात मॅसेज किंवा लिंकवर क्लिक करू नका. त्याचप्रमाणे, तुमची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत WhatsApp, कॉल आणि मेसेजद्वारे शेअर करू नका.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, तुम्हाला पेन्शन किंवा जीवन प्रणाम प्रमाणपत्राशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास, नेहमी सर्वप्रथम अधिकृत बँक आणि CPAO शी संपर्क करा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo