२०१५ चा शेवटचा दिवस असा साजरा करत आहे गुगल

२०१५ चा शेवटचा दिवस असा साजरा करत आहे गुगल
HIGHLIGHTS

गुगल अॅनिमेटेड डूडल बनवून काही अशा प्रकारे २०१५ चा शेवटचा दिवस साजरा करत आहे.

जसे की आपल्या सर्वांना माहितच आहे की, गुगल वेळोवेळी आणि काही खास दिवसांसाठी किंवा कोणत्या महान व्यक्तीसाठी डूडल बनवून त्याला सलाम करतो. ह्या माध्यमातून गुगल एका प्रकारे त्यांचा सन्मान करतो असच म्हणावं लागेल. आणि ह्यावेळी असच काहीस चित्र पाहायला मिळत आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवसाला गुगल एक अॅनिमेटेड डूडल बनवून तो अविस्मरणीय बनवत आहे.  ह्या डूडलला ”Happy New Year From Google” असे नाव दिले गेले आहे.

 

जर तुम्ही ह्या डूडलला नीट पाहिलात, तर आपल्याला पाच पक्षी एका फांदीवर बसलेले दिसतील. पहिल्या चार पक्ष्यांनंतर एक अंड दिसेल. ज्यावर २०१६ असे लिहिले आहे. जर तुम्ही त्यावर क्लिक केलात तर ते चालू होते. हे अतिशय आकर्षितरित्या बनवले गेले आहे.

ह्यावर क्लिक करताच पहिले ४ पक्षी थोडी हालचाल करतात, त्यानंतर ते अंड थोडं हलतं आणि मग पाचवा पक्षी एक घड्याळ काढून वेळ दाखवतो आणि नंतर ते सर्व पक्षी त्या अंड्याकडे बघतात मात्र ते अंड केवळ हालचाल करत राहते. त्यातून काहीही निघत नाही. अंड फूटतसुद्धा नाही. ह्याचाच अर्थ असा की, ह्यासाठी आपल्याला अंदाज लावावा लागेल आणि आज रात्री १२ वाजता हे फुटल्यानंतर ह्यातून काय बाहेर पडेल ते पाहाव लागेल. गुगलद्वारा ब-याच दिवसानंतर ह्या प्रकारचेे अॅनिमेटेड डूडल वापरले गेले आहे.

मागील वर्षी २०१५ च्या स्वागतासाठी गुगलने फटाक्यांसोबत २०१५ चा उडत असलेला डूडल लावला होता, जो की अॅनिमेटेड नव्हता. मात्र ह्यावेळी गुगल काही वेगळे करण्याच्या विचारात आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo