Flipkart Big Saving Days Sale 2023ची तारीख जाहीर, स्मार्टफोन्सवर मिळेल 10 हजार रुपयांपर्यंत सूट

HIGHLIGHTS

Flipkart Big Saving Days Sale 2023 लवकरच होणार सुरु

स्मार्टफोन्सवर तुम्हाला थेट 10 हजार रुपयांपर्यंत सूट

बॅंक ऑफर्स आणि बरेच ऑफर्स मिळतील.

Flipkart Big Saving Days Sale 2023ची तारीख जाहीर, स्मार्टफोन्सवर मिळेल 10 हजार रुपयांपर्यंत सूट

ई कॉमर्स साइटने Flipkart Big Saving Days Sale सेलची तारीख निश्चित केली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने सांगितले की, सेलमध्ये ग्राहक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात सूट घेऊ शकतात. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल भारतात एक दिवस आधी सुरू होईल. फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना कोणत्या खास ऑफर्स मिळणार आहेत, ते बघुयात… 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : WhatsApp वर येणार महत्त्वाचे फिचर ! ग्रुप डिलीट करण्याची मिळेल सूचना, काय आहे खास ?

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2023 सेल 11 मार्चपासून सुरू होणार आहे. 15 मार्चपर्यंत चालणार आहे. तर, प्लॅटफॉर्मच्या प्लस सदस्यांसाठी ही सेल 10 मार्चपासूनच सुरू होईल. सेलमध्ये असे सांगण्यात आले आहे की,  स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवर उत्तम सूट दिली जाईल.

स्मार्टफोन्सवर मिळेल प्रचंड सूट 

Flipkart ने बिग सेव्हिंग डेज सेल 2023 ला टीज केले आहे. टीझर दर्शविते की, Google Pixel 6a सेलमध्ये 26,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. त्याची नियमित किंमत 28,999 रुपये आहे. फोनवर दिलेल्या ऑफरमध्ये ICICI बँक क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या 10 टक्के सूटसह किंमत नमूद केली आहे. यासोबतच EMI व्यवहारांवरही ऑफर आहेत.

या सेलमध्ये नथिंग फोन 1 स्वस्तात विकत घेता येणार आहे. सेलमध्ये Apple च्या iPhone 14 आणि iPhone 14 Plus मॉडेल्सवरही सूट दिली जात आहे. जरी ई-कॉमर्स साइटने त्याच्या किमती निश्चित केल्या नाहीत. Google Pixel 7 या सेलमध्ये 46,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, तर त्याची नियमित किंमत 59,999 रुपये आहे. Pixel 7 Pro सेलमध्ये 67,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याची सूचीबद्ध किंमत 84,999 रुपये आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo