Durga Ashtami and Mahanavmi 2024: प्रियजनांना WhatsApp द्वारे द्या शुभेच्छा! ‘अशा’प्रकारे डाऊनलोड करा Video आणि Status 

HIGHLIGHTS

भारतात सर्वत्र नवरात्रीच्या सणाचा जल्लोष सुरु आहे.

आज 11 ऑक्टोबर रोजी माता महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे.

या वर्षी अष्टमी आणि नवमी 11 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी आहेत.

Durga Ashtami and Mahanavmi 2024: प्रियजनांना WhatsApp द्वारे द्या शुभेच्छा! ‘अशा’प्रकारे डाऊनलोड करा Video आणि Status 

सध्या भारतात सर्वत्र नवरात्रीच्या सणाचा जल्लोष सुरु आहे. या सणानिमित्त जिकडे तिकडे देवीच्या भक्तांचे गरबा नृत्य आयोजन होत असते. तसेच, अनेक प्रकारचे उपवास देखील केले जातात. आपण सर्वांना माहितीच आहे की, नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. आज 11 ऑक्टोबर रोजी माता महागौरीची पूजा करण्यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी तिथीला कन्या पूजन करण्याची परंपरा सर्वत्र आहे. तर, नवमीला नवरात्री समाप्त होते. या वर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहेत. या खास दिवशी आपल्या प्रियजनांना WhatsApp द्वारे शुभेच्छा पाठवा. तसेच तुम्ही स्टेटस आणि Video द्वारे देखील शुभेच्छा पाठवू शकतात. जाणून घेऊयात सविस्तर-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Durga Ashtami आणि Mahanavmi 2024 च्या शुभेच्छा

दुर्गा अष्टमीच्या शुभेच्छा

  • सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणी नमोस्तुते!
  • या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थित, नमस्तस्यै नमस्तयै नमस्तस्यै नमो नमः .
  • नवरात्रीच्या देवीचे नऊ रूप तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य देवो. धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शक्ती मिळो. सर्वांना दुर्गा अष्टमीच्या शुभेच्छा!
  • लाल रंगाच्या दुपट्टयाने सजला मातेचा दरबार, सुखी झालं मन, हर्षित झाला संसार, सुवर्ण पावलांनी आई आली तुमच्या द्वारी, दुर्गाष्टमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
  • महागौरी देवीच्या उपासनेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवोत. तिची कृपा तुम्हाला शाश्वत सुख आणि समाधान मिळवून देवो. महाअष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
durga ashtami wishes 2024

महानवमीच्या शुभेच्छा

  • देवी सिद्धिदात्रीच्या उपासनेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश येवो. नवरात्री नवमीच्या शुभेच्छा!
  • आई, तू नारायणी आहेस, सर्व काही करणारी तूच आहेस, तुझ्याशिवाय माझे काय होईल? आपल्या दिव्यदृष्टीने जग आनंदाने भरून जाऊ दे. महानवमी 2024 च्या हार्दिक शुभेच्छा
  • ज्या आईच्या आश्रयाने सर्व जग आहे त्या मातेला वंदन. त्या मातेच्या चरणांशी एकत्र येऊन भक्तीचे पुष्प अर्पण करूया. महानवमी 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.
  • नवरात्रीचे नऊ दिवस, सण हा मांगल्याचा असे. देवीची नऊ रूपे पाहून, मन तिच्याच ठायी वसे.
  • नवदुर्गेची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुमचे जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती येवो. नवरात्र नवमीच्या खूप खूप शुभेच्छा
Navratri-Garba.png
Navratri-Garba.png

अशाप्रकारे Video डाऊनलोड करून शुभेच्छा पाठवा.

जर तुम्हाला दुर्गा अष्टमी आणि नवमीनिमित्त व्हीडिओ शेअर करून शुभेच्छा द्यायच्या असतील तर, आवडता Video डाउनलोड करण्यासाठी पुढील प्रक्रिया फॉलो करा.

  • सर्वप्रथम सोशल मीडियावरील (यु-ट्यूब आणि इंस्टाग्रामवरील) तुम्हाला आवडलेल्या Video ची लिंक कॉपी करा.
  • त्यानंतर फोनवर गुगल सर्चवर जाऊन ‘यु-ट्यूब व्हीडिओ डाऊनलोडर’ किंवा ‘इन्स्टा व्हीडिओ डाउनलोडर’ असे सर्च करा.
  • पुढे तुमच्या स्क्रीनवर अनेक साईट दिसतील, ज्याद्वारे मोफतमध्ये व्हीडिओ देखील डाउनलोड करता येईल.
  • त्यानंतर साईट ओपन करून डाऊनलोड करण्यासाठी व्हीडिओची लिंक पेस्ट करा. आता डाऊनलोडींग प्रक्रिया करून व्हीडिओ डाउनलोड करा.
  • आता तुमचा आवडता व्हीडिओ तुमच्या फोनमध्ये डाउनलोड होईल. हा व्हीडिओ तुम्ही WhatsApp वर शेअर करून नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo