Drishyam 2 ट्रेलर रिलीज : प्रेक्षकांकडून मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, पहा Video

HIGHLIGHTS

अजय देवगणचा बहुप्रतीक्षित चित्रपट Drishyam 2चा ट्रेलर रिलीज

या थ्रिलर चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Drishyam 2 ट्रेलर रिलीज : प्रेक्षकांकडून मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, पहा Video

ज्या हिंदी चित्रपटप्रेमी प्रेक्षकांनी अजय देवगणचा 'दृश्यम' पाहिला आहे, त्यांना या चित्रपटाची आणि 2 ऑक्टोबरची कथा उत्तम प्रकारे ठाऊक आहे. त्यानंतर, आता अजय देवगण या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'दृश्यम 2' आणण्यासाठी सज्ज झाला आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो संपूर्ण सस्पेन्सपूर्ण आहे. या चित्रपटात साळगावकर कुटुंबाची फाईल पुन्हा उघडली जाणार असून अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी अजय देवगण फक्त अभिनेत्री तब्बूच नाही तर अक्षय खन्नादेखील मुख्य असणार आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : 90Hz डिस्प्लेसह कमी किमतीत Motoचा नवीन फोन लाँच, मिळतील अनेक उत्कृष्ट फीचर्स

 ट्रेलरमध्ये काय आहे ? 

 या सस्पेन्सने भरलेल्या थ्रिलर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सात वर्षांनंतर साळगावकर कुटुंबापुढे परत त्यांचा भूतकाळ येतो. ट्रेलरच्या सुरुवातीस अजय देवगण उर्फ ​​विजय साळगावकर पुन्हा पोलिसांना चकमा देण्यासाठी पूर्वीसारखाच विचार करत असल्याचे दिसत आहे. मात्र, ट्रेलरच्या शेवटी एक दृश्य आहे, ज्यामध्ये विजय आपला गुन्हा कबूल करताना दिसत आहे.

प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद 

'दृश्यम 2'चा ट्रेलर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अजय देवगण, अक्षय खन्ना आणि तब्बू यांच्या अभिनयाचे लोक कौतुक करत आहेत. ट्विटरवर अनेकांनी ट्रेलरचे संवाद लिहिले आहेत. 

 दरम्यान, हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच्या इतर कलाकारांमध्ये तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि रजत कपूर यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. 2020 मध्ये निधन झालेल्या निशिकांत कामत यांनी 'दृश्यम' दिग्दर्शित केला होता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo