HIGHLIGHTS
अजय देवगणचा आगामी चित्रपट Drishyam 2 च्या तिकिटांवर 25% सूट
चित्रपटाच्या मेकर्सने आणली अप्रतिम ऑफर
'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार
बॉलीवूड सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या 'दृश्यम 2' या चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. दिवाळीच्या खास मुहूर्तावर, निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली आहे. ज्याअंतर्गत त्यांना या 2 दिवसांत 25% कमी किमतीत तिकिटे मिळतील. म्हणजेच 24 आणि 25 तारखेला 'दृश्यम'साठी तिकीट बुक करणाऱ्यांना हा चित्रपट मूळ किमतीपेक्षा 25 टक्के कमी दरात बघता येईल.
Surveyहे सुद्धा वाचा : OnePlus वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी ! आता सहज घेता येईल 5G इंटरनेट स्पीडचा आनंद
कोणत्याही मल्टिप्लेक्सच्या वेबसाइट किंवा ट्विटर हँडलला भेट द्या. उदा. PVR, INOX किंवा CARNIVAL येथे 25% कमी दरात चित्रपटाची तिकिटे बुक करा. तेथे दिलेल्या डिटेल्सच्या आधारे तिकीट बुक करा आणि या ऑफरचा लाभ घ्या. याशिवाय या ऑफरचे तपशील BookMyShow सारख्या साइटवरही उपलब्ध आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी निर्मात्यांनी एक ऑफर चालवली होती, ज्याला त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच आता मेकर्सने आणखी एक ऑफर आणली आहे. अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. भूषण कुमार निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे.
चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता आणि 'दृश्यम-2' ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत होता. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल. पहिल्या दिवशी हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल, असा विश्वास आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile