Dish TV भारतातील सर्वात मोठ्या DTH प्लेयर्सपैकी एक आता ग्राहकांना नवीन OTT प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे फक्त सामान्य OTT प्लॅन्स नाहीत. नवीन Watcho OTT प्लॅन मुळात Dish TV ची OTT ऍग्रीगेशन सर्व्हिस आहे. डिश टीव्हीच्या वॉचोच्या एकाच सबस्क्रिप्शनसह तुम्ही एकाधिक प्लॅटफॉर्म आणि त्यांच्या मोठ्या कंटेन्ट लायब्ररीमध्ये प्रवेश मिळवू शकता. ZEE5, Disney + Hotstar सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये एकत्रित केले जाईल. चला डिश टीव्हीने लाँच केलेल्या प्लॅन्सवर एक नजर टाकूया…
डिश टीव्हीने त्याच्या OTT प्लॅटफॉर्म Watcho द्वारे चार नवीन प्लॅन सादर केले. या चार नवीन प्लॅनची किंमत 49 रुपये, 99 रुपये, 199 रुपये आणि 299 रुपये प्रति महिना असेल. कंपनीने या सेवेसाठी 'वन है तो डन है' अशी टॅगलाइन दिली आहे. याचा अर्थ ग्राहकांना सबस्क्रिप्शनसाठी अनेक प्लॅटफॉर्मवर जावे लागणार नाही. येथे, ते एकाच सब्स्क्रिप्शनद्वारे पूर्ण काम करू शकतात.
प्रास्ताविक ऑफर म्हणून DishTV, D2H आणि Siti केबल ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एका महिन्यासाठी नवीन सेवेचा लाभ घेऊ शकतात. एकदा सदस्यत्व घेतल्यानंतर वापरकर्त्यांना ऍप किंवा वेबद्वारे मोबाइल, टॅब्लेट, लॅपटॉप आणि टीव्हीवर OTT कंटेंटमध्ये प्रवेश मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile