Palm Payment: ऑनलाईन पेमेंटची अनोखी पद्धत! फक्त हाथ दाखवल्यास होईल पेमेंट? इंटरनेटवर Video तुफान व्हायरल 

HIGHLIGHTS

चीनमधील Palm Payment तंत्रज्ञान ऑनलाईन पेमेंटची नवी पद्धत

सध्या सोशल मीडियावर Palm Payment पद्धतीचा व्हिडिओ तुफान वायरल होत आहे.

पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर राणा हमजा सैफने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Palm Payment: ऑनलाईन पेमेंटची अनोखी पद्धत! फक्त हाथ दाखवल्यास होईल पेमेंट? इंटरनेटवर Video तुफान व्हायरल 

Palm Payment: आजकाल अनेक युजर्स खिशात रोख न ठेवता ऑनलाईनरित्या पेमेंट करतात. आत्तापर्यंत तुम्ही QR कोड स्कॅन करून आणि UPI ॲप्सद्वारे ऑनलाइन पेमेंट व्यवहार होत असताना पहिले असतील. दरम्यान, तुम्ही कधी तुमच्या तळहात दाखवून ऑनलाइन पेमेंट करताना पाहिले आहे का? होय, तुम्ही ते बरोबर वाचत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. ज्यामध्ये हस्तरेखाचा वापर करून पेमेंट केल्याचे दाखवले जात आहे. जाणून घेऊयात सविस्तर-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Samsung Galaxy F05 Discount: 7000 रुपयांअंतर्गत खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही

Instagram वर Video होतोय व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Rana Hamza Saif ( RHS ) (@ranahamzasaif)

हा व्हिडिओ प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagramवर शेअर करण्यात आला आहे. पाकिस्तानी कंटेंट क्रिएटर राणा हमजा सैफने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चीनचे नवीन तंत्रज्ञान दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये सैफ त्याच्या मित्रांसोबत किराणा दुकानात जातो. इथेच त्याचा एक मित्र त्याच्या तळहाताद्वारे पेमेंट व्यवहार करताना दाखवतो. त्यामुळे बाकीचे मित्र आश्चर्यचकित झाले आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, एकदा हस्तरेखा नोंदणीकृत झाल्यानंतर, चीनमध्ये कुठेही सहज पेमेंट केले जाईल.

Palm Payment तंत्रज्ञान

व्हायरल व्हिडिओनुसार, ज्या यूजर्सने या सिस्टीमवर पहिल्यांदा नोंदणी केली आहे ते चीनमध्ये स्कॅनरसमोर हात दाखवून कुठेही पेमेंट करू शकतात. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की ते कार्ड आणि UPI पेमेंटपेक्षा खूप जलद प्रक्रिया करते. मात्र, या पेमेंट पद्धतीचे संपूर्ण तपशील, जसे की, कोणते तपशील समोर दिले जावेत आणि कागदावर काम कसे केले जाईल हे उघड केलेले नाही. पण, नेटिझन्स म्हणतात की पाम पेमेंट पद्धत नवीन आणि पाहण्यास अतिशय सोपी दिसत आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, याआधीही पाम पेमेंट सिस्टमचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यापूर्वी आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनीही त्यांच्या X हँडलवर असाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये एका महिलेने बीजिंग मेट्रोमध्ये आपल्या तळहाताने पेमेंट कटून लोकांना आश्चर्यचकित केले. महिलेने त्यांना सांगितले की, चीनमध्ये कॅशलेस पेमेंटचा प्रसार खूप वेगाने झाला आहे. येथे लोक QR कोड आणि चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान खूप वापरत आहेत. आता पामद्वारे पेमेंट करणे देखील लोकांमध्ये वेगाने पसरत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo