Box Office Collection : ‘Thor’ ने मंगळवारी भारतात सर्वाधिक कमाई केली, बघुयात इतर चित्रपटांची कमाई

HIGHLIGHTS

'Thor : लव्ह अँड थंडर' ने मंगळवारी भारतात सर्वाधिक कमाई केली

रॉकेट्री चित्रपटाने आतापर्यंत सुमारे एक कोटी रुपयांची कमाई केली

जाणून घ्या, इतर चित्रपटांनी किती कमाई केली ?

Box Office Collection : ‘Thor’ ने मंगळवारी भारतात सर्वाधिक कमाई केली, बघुयात इतर चित्रपटांची कमाई

आर माधवनच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम करण्यासाठी आणि चित्रपट फ्लॉप बनवण्यासाठी अनेक कट रचले गेले. पण इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या संघर्षावर बनलेल्या या चित्रपटाने मंगळवारीही वर्ड ऑफ माऊथ (म्हणजे माऊथ पब्लिसिटी) द्वारे चांगली कमाई केली आहे. तसेच, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ख्रिस हेम्सवर्थच्या 'थॉर : लव्ह अँड थंडर' या चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. खरंच, या चित्रपटाने मंगळवारी कोटींचा व्यवसाय केला आहे. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : BSNLचा एकदम जबरदस्त प्लॅन, 100 रुपयांत मिळेल दररोज 1GB डेटा, फ्री कॉलिंग आणि दीर्घकाळ वैधता

रॉकेट्री: द नंबी इफेक्ट

आर माधवन दिग्दर्शित 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' चित्रपटाने मंगळवारी जगभरात 30 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समोर येत असलेल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने बाराव्या दिवशी सुमारे एक कोटी रुपयांची कमाई केली आहे.

थॉर: लव्ह अँड थंडर

मार्वल चित्रपट 'थॉर : लव्ह अँड थंडर' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ख्रिस हेम्सवर्थ, ख्रिश्चन बेल, नताली पोर्टमन आणि टेसा थॉम्पसन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने सहा दिवसांत तब्बल 74.72 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे, सहाव्या दिवशी चित्रपटाच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, 'थॉर : लव्ह अँड थंडर'ने जवळपास 4.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

खुदा हाफिज 2 – अग्नि परिक्षा

विद्युत जामवाल आणि शिवलीका ओबेरॉय स्टारर 'खुदा हाफिज 2 – अग्नि परीक्षा' 8 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ऍक्शन ड्रामा चित्रपटाने पहिल्या मंगळवारी सुमारे 1.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह त्याच्या एकूण कमाईचा आकडा 9 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

जुग जुग जियो 

वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर अभिनीत 'जुग जुग जिओ' चित्रपटाचा वेग आता  मंदावला आहे. बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 79.18 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo