सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला बॉलीवूड चित्रपट 'भूल भुलैया 2' ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. जर तुम्हाला चित्रपटगृहात चित्रपट पाहता आला नसेल, तर आता तुम्हाला हा धमाकेदार चित्रपट ऑनलाइन देखील पाहता येणार आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री कियारा अडवाणी, अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता राजपाल यादव सारखे सुप्रसिद्ध कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भूल भुलैया 2 हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे. क्रिटिक्सनाही हा चित्रपट आवडला आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
चित्रपट 19 जून रोजी NETFLIX वर रिलीज होणार
हा मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट या महिन्यातच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. होय, तुम्हाला फक्त एका दिवसानंतर तुमच्या मोबाईल फोनवर किंवा स्मार्ट टीव्हीवर चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीज बज्मी यांनी केले आहे. मे महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 19 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
बॉलीवूडची वाईट स्थिती सुधारत, कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2 हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रिलीजच्या एका महिन्यातच या चित्रपटाने 175 कोटींची कमाई केली आहे. याआधी असे वृत्त होते की, हा चित्रपट 8 आठवडे थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर प्रीमियर होईल परंतु आता हा चित्रपट केवळ 4 आठवड्यांनंतर ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या यशाने अभिनेता कार्तिक आर्यन भारावून गेला आहे. कार्तिकच्या या चित्रपटासमोर मोठ्या कलाकारांचे चित्रपटसुद्धा अपयशी ठरताना दिसले. चौथ्या आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. 'भूल भुलैया 2' च्या यशाने कार्तिकच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही भर पडली आहे. यानंतर आता त्याच्या इतर चित्रपटांचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile