सलमानसोबत त्याच्या 2 सुपरहिट हिरोइन्स दिसणार, ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये ‘या’ अभिनेत्रींची एन्ट्री

सलमानसोबत त्याच्या 2 सुपरहिट हिरोइन्स दिसणार, ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये ‘या’ अभिनेत्रींची एन्ट्री
HIGHLIGHTS
  • 'किसी का भाई', 'किसी की जान' चित्रपटात 2 सुपरहिट हिरोइन्सची एंट्री

  • भाग्यश्री आणि भूमिका चावला या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार अशी चर्चा

  • अफवांनुसार, वेंकटेश आणि राम चरण यांचे चित्रपटात कॅमिओ आहेत.

सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात अनेक कलाकार दिसणार आहेत. आता नव्या वृत्तानुसार, आणखी 2 अभिनेत्री या चित्रपटात सामील होत आहेत. या दोन्ही अभिनेत्री सलमानच्या पहिल्या सहकलाकार होत्या आणि त्यांनी त्यांच्यासोबत एक एक हिट चित्रपट दिलेला आहे. त्या दोन्ही अभिनेत्री सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री आणि भूमिका चावला या आहेत. 

हे सुद्धा वाचा : अनोखी ऑफर ! महागडे फोन घेण्याचे टेन्शन विसरा, NOKIA रेंटवर देतोय प्रीमियम 5G स्मार्टफोन

 सलमान खानने भाग्यश्रीसोबत 'मैंने प्यार किया' हा सुपरहिट चित्रपट दिला आहे. या चित्रपटातील दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. त्याबरोबरच, भूमिकाने सलमानसोबत 'तेरे नाम' हा सुपरहिट चित्रपट दिला आहे.  सलमानला त्याच्या जुन्या सहकलाकारासह मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते पुन्हा एकदा उत्सुक आहेत. खरं तर, सलमान किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांच्या बाजूने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

चित्रपटाची स्टार कास्ट 

आत्तापर्यंत या चित्रपटात सलमान आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम आणि विजेंदर सिंग हे देखील चित्रपटाचा एक भाग आहेत. अफवांनुसार, वेंकटेश आणि राम चरण यांचे चित्रपटात कॅमिओ आहेत.

'किसी का भाई', 'किसी की जान' हा चित्रपट पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. ईदला रिलीज होणारा सलमान खानचा हा 10 वा चित्रपट आहे. यापूर्वी वॉन्टेड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, किक, बजरंगी भाईजान, सुलतान, ट्यूबलाइट आणि भारत हे चित्रपट ईदला प्रदर्शित झाले आहेत. या वर्षी सलमानला चित्रपटसृष्टीत 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. यादरम्यान सलमानने सर्व चाहत्यांचे आभार मानताना 'किसी का भाई', 'किसी की जान' चित्रपटाची घोषणा केली होती.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo
Compare items
  • Water Purifier (0)
  • Vacuum Cleaner (0)
  • Air Purifter (0)
  • Microwave Ovens (0)
  • Chimney (0)
Compare
0