Amazon Great Freedom Festival Sale 2022: मिळतील ‘हे’ सर्वोत्तम डिल्स

Amazon Great Freedom Festival Sale 2022: मिळतील ‘हे’ सर्वोत्तम डिल्स
HIGHLIGHTS

Amazon सेलमध्ये SBI कार्डवर 10 टक्के सूट मिळेल

Amazon Great Freedom Festival Sale 2022 मध्ये सर्वोत्तम सवलती मिळतील

सेलमध्ये मिळणार अनेक प्रोडक्ट्स

ई-कॉमर्स कंपनी Amazon पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी सेल आणत आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, Amazon Great Freedom Festival Sale 2022 चे आयोजन 6 ते 10 ऑगस्ट दरम्यान केले जात आहे. तुम्ही गेल्या महिन्यातील प्राइम डे सेलचा लाभ घेऊ शकला नसाल, तर हा सेल तुमच्यासाठी आहे.

या सेलमध्ये अनेक आकर्षक डील्स आणि सूट मिळणार आहेत. Amazon सेल दरम्यान SBI कार्ड व्यवहारांवर 10 टक्के सूट दिली जाईल.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Gmail वरील नको ते मेल्स आपोआप होतील डिलीट, 'ही' अप्रतिम युक्ती वापरा…

फेस्टिव्ह सिझनआधी, Amazon ने आगामी डील आणि ऑफर्सचे टीझर रिलीज केले आहेत. 'Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल'मध्ये विक्रीदरम्यान रात्री 8 वाजल्यापासून ते अर्ध्या रात्री पर्यंत मोठी सवलत आणि आकर्षक डिल्स मिळणार, अशी अपेक्षा आहे.

अहवालानुसार, ऍमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन आणि ऍक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. हँडसेटवर सवलतीच्या शोधात तुमचा फोन बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. याशिवाय Amazon, नो-कॉस्ट EMI पेमेंट, एक्सचेंज ऑफर आणि फ्लॅगशिप आणि प्रीमियम स्मार्टफोन्सवर उत्तम डील ऑफर करणार आहे.

Amazon च्या आगामी सेलमध्ये लॅपटॉपवर 40,000 पर्यंत सूट दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच, टॅबलेटवर 45 टक्के आणि हेडफोनवर 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आवडत्या ब्रँड प्रोडक्टवर सूट मिळवताना राखी भेटवस्तू खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असेल.

 Amazon च्या आगामी सेल दरम्यान Kindle, Echo स्पीकर आणि Fire TV Stick वर सवलत मिळण्याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo