Apple ची मोठी घोषणा! ‘या’ दिवशी सुरु होणार WWDC 2025, जाणून घ्या सर्व डिटेल्स 

Apple ची मोठी घोषणा! ‘या’ दिवशी सुरु होणार WWDC 2025, जाणून घ्या सर्व डिटेल्स 
HIGHLIGHTS

Apple ने अखेर वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) ची घोषणा केली.

Apple चा हा टेक इव्हेंट 9 जूनपासून सुरू होणार आहे, जो 13 जूनपर्यंत लाईव्ह राहील.

या इव्हेंटमध्ये Apple कंपनी त्यांचे सॉफ्टवेअर अपग्रेड सादर करते.

जगप्रसिद्ध टेक जायंट Apple ने अखेर वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स WWDC 2025 ची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Apple चा हा टेक इव्हेंट 9 जूनपासून सुरू होणार आहे, जो 13 जूनपर्यंत लाईव्ह राहील. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या इव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे सॉफ्टवेअर अपग्रेड सादर करते. एवढेच नाही तर, विशेष म्हणजे हार्डवेअरशी संबंधित काही मोठ्या घोषणा देखील होऊ शकतात. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-

Also Read: Vivo T3 Ultra वर मिळतोय भारी Discount! जबरदस्त 50MP प्रायमरी आणि सेल्फी कॅमेरा उपलब्ध

Apple WWDC 2025

आम्ही तुम्हाला सांगतो की, एका Apple द्वारे या पोस्टमध्ये WWDC 2025 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. लक्षात घ्या की, WWDC 2025 इव्हेंट 9 जून रोजी सुरू होणार आहे. एवढेच नाही तर, WWDC25 वेबसाइटवर हे उघड झाले आहे की, हा कार्यक्रम 9 जूनपासून सुरू होईल, जो 13 जूनपर्यंत लाईव्ह असेल.

WWDC 2025 कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील Apple पार्क येथे आयोजित केले जाईल, जो एक इन-पर्सन इव्हेंट असेल. गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यावर्षीही चाहते त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाहता येईल. Apple कंपनी Apple डेव्हलपर App आणि Apple डेव्हलपर वेबसाइटद्वारे या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहे.

APPLE WWDC 2025

इव्हेंटदरम्यान होणाऱ्या अपेक्षित घोषणा

iOS 19 आणि iPadOS 19

Apple iOS 19 आणि iPadOS 19 मध्ये डिझाइनमध्ये मोठा बदल करणार आहे, जो iOS 7 नंतरचा सर्वात मोठा व्हिज्युअल चेंज असेल. या अपडेटमध्ये पुन्हा डिझाइन केलेले आयकॉन, मेनू आणि सिस्टम बटन्स येतील, ज्यामुळे iPhone, iPad आणि Mac वर आणखी सहज अनुभव मिळणार आहे.

macOS 16

iOS आणि iPadOS प्रमाणे, macOS 16 ला देखील एक नवीन रूप मिळणार आहे. जे त्याची डिझाईन Apple च्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमशी अधिक सुसंगत करेल, अशी अपेक्षा आहे. नवीन App आयकॉन, अपडेटेड मेनू आणि मॅक OS आणि iOS दरम्यान अधिक सुरळीत अनुभव अपेक्षित आहे.

नवीन Mac Pro

WWDC हे मुख्यतः सॉफ्टवेअरबद्दल असले, तरी गेल्या काही वर्षांत Apple ने तेथे नवीन हार्डवेअर सादर केले आहेत. लीकनुसार, आगामी कार्यक्रमात आपल्याला फक्त नवीन Mac Pro दिसू शकतो, कारण बहुतेक इतर मॅक मॉडेल्स अलीकडेच अपडेट केले गेले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo