अॅप्पल आयपॅड मिनी ४ च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ७.९ इंचाची रेटिना डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन २०४८x१५३८ पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा अॅप्पल A8 चिपसह M8 मोशन को-प्रोसेसरने सुसज्ज आहे.
अॅप्पलने आपला नवीन टॅबलेट आयपॅड मिनी ४ भारतात लाँच केला आहे, हा आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा नवीन टॅबलेट आयपॅड मिनी ३ चे अपडेटेड वर्जन आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्याच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर आयपॅड मिनी ४ वायफाय १६जीबीची किंमत २८,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर ह्याच्या वायफाय ६४ जीबी आवृत्तीची किंमत ३५,९००, वायफाय १२८जीबीची किंमत ४२,९००, वायफाय+सेल्युलर १६जीबीची किंमत ३८,९००, वायफाय+सेल्युलर ६४ जीबीची किंमत ४५,९०० आणि वायफाय+सेल्युलर १२८ जीबीची किंमत ५२,९०० रुपये ठेवण्यात आली आहे.
अॅप्पल आयपॅड मिनी ४ च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ७.९ इंचाची रेटिना डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन २०४८x१५३६ पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा अॅप्पल A8 चिपसह M8 मोशन को-प्रोसेसरने सुसज्ज आहे.
त्याशिवाय ह्यात टचआयडी फिंगरप्रिंट सेंसर उपलब्ध आहे. ह्या टॅबलेटमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि १.२ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा उपलब्ध आहे.
ह्याच्या कनेक्टिव्हीटीबाबत सांगायचे झाले तर, आयपॅड मिनी ४मध्ये 4G LTE सपोर्ट उपलब्ध आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५,१२४mAh इतकी बॅटरी दिली गेली आहे, जी सर्वसाधारण १० तासांपर्यंत बॅकअप देण्यात सक्षम आहे.