Amazon च्या आगामी सेलमध्ये ऑफर्सचा वर्षाव, निम्म्या किमतीत मिळतील AC, टीव्ही

HIGHLIGHTS

Amazon वर ग्रेट समर सेल लवकरच सुरु होणार

हा सेल 4 मे पासून तर 10 मे पर्यंत सुरु असणार

AC वर 55 टक्क्यांपर्यंत सूट

Amazon च्या आगामी सेलमध्ये ऑफर्सचा वर्षाव, निम्म्या किमतीत मिळतील AC, टीव्ही

Amazon वर ग्रेट समर सेल लवकरच सुरु होणार आहे. यासाठी कंपनीने एक मायक्रोसाईट लाईव्ह केली आहे. दरम्यान, फक्त फोनवरच नाही तर स्मार्ट टीव्ही आणि एसी आणि इतर उपकरणांवर भरपूर सूट मिळणार आहे. सध्या कंपनीने कोणत्या सेगमेंटवर किती सूट दिली जात आहे, हे सांगितले आहे. बघुयात सविस्तर- 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

स्मार्ट टीव्ही मिळतील स्वस्तात

तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला येथे जबरदस्त डील्स मिळणार आहेत. तुम्हाला टॉप ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. हे स्मार्ट TV तुम्हाला अगदीत निम्म्या किमतीत मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने डिल्सचा खुलासा केलेला नाही, परंतु एक माहिती निश्चितपणे दिलेली आहे. उदा. सॅमसंग 32 एचडी रेडी स्मार्ट टीव्ही 22,900 रुपयांऐवजी 1X,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. आता इथे X च्या जागी काय असणार, हे अजूनही पडद्याआड आहे.

 AC वर 55 टक्क्यांपर्यंत सूट 

या उन्हाळ्यात जर नवीन AC खरेदी करण्याचा विचार असेल तर, Amazon Great Summer Sale मध्ये AC अगदी कमी किमतीत किंवा निम्म्या किमतीत खरेदी करता येतील. मिळालेल्या माहितीनुसार, येथे AC वर 55 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. 24,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत AC खरेदी करता येईल, अशी माहिती उघड झाली आहे.

इतकेच नाही, तर महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे एखादा जुना किंवा विद्यमान AC असेल आणि तुम्हाला तो एक्सचेन्ज करायचा असेल तर, तो एक्स्चेंज केल्यावर तुम्हाला एकूण 5,500 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo