दरवर्षी प्रमाणे या यावर्षीही स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘Amazon Great Freedom Festival 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. आज अखेर या सेलची तारीख देखील जाहीर झाली आहे. हा सेल येत्या 6 ऑगस्ट 2024 रोजी सुरू होणार आहे. ही सेल सुमारे एक आठवडा LIVE राहण्याची शक्यता आहे. या सेलच्या ऑफर आणि शॉपिंग कॅटेगरी आजपासूनच Amazon वर लाइव्ह करण्यात आले आहेत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
नेहमीप्रमाणे प्राईम मेम्बर्ससाठी ही काही वेळेआधीच लाईव्ह केली जाईल. म्हणजेच प्राईम मेंबर्ससाठी ही सेल 6 ऑगस्ट 2024 मध्यरात्री 12 वाजतापासून लाईव्ह होणार आहे. तर, सर्व मेंबर्ससाठी ही सेल 6 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता LIVE केली जाईल. या सेलदरम्यान खास ऑफर्स, सवलती आणि सर्वोत्तम पर्यायांबद्दल तपशीलवार माहिती जाणून घ्या. या सेलमध्ये तुम्ही SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 10% पर्यंत झटपट सूट मिळवू शकता.
तुम्ही Amazon Great Freedom Festival इव्हेंटमधून 40% पर्यंत सूटसह 5G स्मार्टफोन आणि मोबाईल फोन ॲक्सेसरीज खरेदी करण्यास सक्षम असाल. या सेलमध्ये, तुम्हाला वर्षातील सर्वात भारी डिस्काउंट डील्स मिळतील. जिथे तुम्हाला Oneplus, Samsung, Realme, IQOO, Tecno, Xiomi Lava, Honor सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन्स उत्तम किमतीत खरेदी करण्याची ऑफर मिळेल.
Smart TV आणि अप्लायन्सेसवर 65% सूट
तुम्ही ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलदरम्यान तब्बल 65% पर्यंत सवलतीसह स्मार्ट टीव्ही आणि उपकरणे खरेदी करण्यास सक्षम असाल. या सेलमध्ये लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येणार आहेत. या सेलमध्ये प्रीमियम प्लस टीव्ही, लक्झरी लाइट टीव्ही इ. विविध श्रेणी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
होम अप्लायन्सेसवर 65% सूट
Amazon Great Freedom Festival मध्ये 60% पर्यंत सवलतीसह गृहोपयोगी वस्तू देखील खरेदी करता येतील. या सेलदरम्यान, तुम्हाला वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन, किचन चिमनी, डिशवॉशर आणि अनेक नवीन लाँच प्रोडक्ट्स 50% ते 65% पर्यंत सवलतीत मिळतील. तसेच, तुम्हाला उपकरणांवर भारी एक्सचेंज ऑफर्स देखील मिळणार आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile