HIGHLIGHTS
ऑनलाईनरित्या Aadhar card मोफतमध्ये अपडेट करण्यासाठी आज शेवटचा दिवस
उद्यापासून यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
Aadhar च्या अधिकृत वेबसाइटवरून ही प्रक्रिया करता येईल.
ऑनलाईनरित्या Aadhar card मोफतमध्ये अपडेट करण्यासाठी ग्राहकांकडे आज शेवटी संधी आहे. जर तुम्ही आज आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला उद्यापासून यासाठी शुल्क भरावे लागेल. सरकारने 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक केले आहे. जाणून घेऊयात, उद्यापासून किती रूपये शुल्क भरावे लागणार?
Surveyजर तुम्ही 14 जूननंतर तुमचे आधार अपडेट करायला गेलात तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 15 मार्च ते 14 जून या कालावधीत UIDAI द्वारे ऑनलाइन आधार अपडेट मोफत करण्यात आले होते आणि आज या ऑफरचा शेवटचा दिवस आहे.
– Aadhar च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
– वर myAadhaar हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
– त्यानंतर "अपडेट आधार" विभागात जा.
– आता तुमचा आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड टाकावा लागेल.
– आता तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर OTP येईल आणि नंतर व्हेरिफिकेशन केले जाईल.
– यानंतर पत्ता, फोन नंबर, नाव किंवा जन्मतारीख यांचा तपशील द्या. यासह काही कागदपत्रांची हार्ड कॉपी अपलोड करण्याची गरज आहे.
– अखेर आता कन्फर्म आणि सबमिट बटनवर क्लिक करा.
अशाप्रकारे तुमचे आधार कार्ड ऑनलाईनरित्या घरबसल्या आणि मोफत अपडेट होईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile