आधार केंद्रात जाण्याची गरज नाही, आता घरबसल्या अपडेट होणार तुमचे आधार कार्ड

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 14 Jun 2022
HIGHLIGHTS
  • आता घरबसल्या अपडेट होईल तुमचे आधार कार्ड.

  • आधार कर्मचारी आता लॅपटॉप घेऊन तुमच्या घरी पोहोचतील.

  • आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार सर्व्हिस सेंटरवर जाण्याची गरज नाही.

आधार केंद्रात जाण्याची गरज नाही, आता घरबसल्या अपडेट होणार तुमचे आधार कार्ड
आधार केंद्रात जाण्याची गरज नाही, आता घरबसल्या अपडेट होणार तुमचे आधार कार्ड

खूप कमी भारतीय असे आहेत, ज्यांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. आतापर्यंत या कामासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते, मात्र आता हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. येत्या काळात घरबसल्या आधार अपडेट होणार आहे. काही कर्मचारी लॅपटॉप घेऊन तुमच्या घरी पोहोचतील आणि तुम्हाला तुमच्या आधार मेनमध्ये जे काही अपडेट्स करायचे आहेत ते बदल कर्मचारी तुमच्या घरीच करून देणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत सविस्तर तपशील...  

 हे सुद्धा वाचा : 'पृथ्वीराज' फ्लॉप झाला तरीही, शाहरुख-सलमानला मागे टाकून अक्षय बनला सर्वात लोकप्रिय अभिनेता

UIDAI ने या कामासाठी आधीच 48,000 पोस्टमन नियुक्त केले आहेत. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे कर्मचारी हे काम करतील, त्यांना UIDAI कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.  ते तुमच्या घरी येऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करून देणार आहेत. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या मदतीने तुमच्या मुलाचे आधार कार्ड देखील मिळवू शकता.
 
जर तुम्हाला आधार अपडेट करायचे असेल तर यापेक्षा उत्तम संधी मिळणार नाही. तुम्हाला आधार सेवा केंद्राला भेट देण्याची किंवा कोणत्याही अडचणीला तोंड देण्याची गरज नाही. या कामाची जबाबदारी पोस्टमनकडे देण्यात आली आहे. आधारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या टप्प्यात 48,000 लोकांची भरती करण्यात आली असून पुढच्या टप्प्यात 1.5 लाख पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांसह काम पूर्ण केले जाईल.

कशी असेल प्रक्रिया ? 

सुरुवातीला प्रत्येक कर्मचाऱ्याला लॅपटॉप, डेस्कटॉप सारखे डिजिटल उपकरण दिले जाईल. मुलांसाठी चाईल्ड आधार कार्ड अपडेट आणि क्रिएशन सिस्टम असेल. कर्मचार्‍यांना बाल आधार कार्ड तयार करण्यासाठी मोबाईलवर अवलंबून असलेले उपकरण दिले जातील. उर्वरित कामासाठी लॅपटॉप आणि डेस्कटॉपचा वापर केला जाईल. यामुळे पूर्वी लोकांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागत होते, तो त्रास पुन्हा होणार नाही, अशी अपेक्षा आहे. 

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. This Is My First Time To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. I Also love to write on different topics and reading books. Read More

Tags:
aadhar card e aadhar my aadhar
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
HP 15.6 LAPTOP BAG Backpack  (Black, Black, 25 L)
HP 15.6 LAPTOP BAG Backpack (Black, Black, 25 L)
₹ 275 | $hotDeals->merchant_name
Vadhavan Roller Anti Aging 100% Natural Jade Facial Roller healing Slimming Massager Anti Aging 100% Natural Jade Facial Roller healing Slimming Massager Massager  (Green)
Vadhavan Roller Anti Aging 100% Natural Jade Facial Roller healing Slimming Massager Anti Aging 100% Natural Jade Facial Roller healing Slimming Massager Massager (Green)
₹ 175 | $hotDeals->merchant_name
Kuvadiya Sales Magnetic Vibra Plus Head Massager Hairbrush with Double Speed in Treatment | hair massager
Kuvadiya Sales Magnetic Vibra Plus Head Massager Hairbrush with Double Speed in Treatment | hair massager
₹ 140 | $hotDeals->merchant_name
AGARO 33511 MAGMA Air compression leg massager with handheld controller, 3 massage mode and intensity for feet, calf and thigh Massager  (Black)
AGARO 33511 MAGMA Air compression leg massager with handheld controller, 3 massage mode and intensity for feet, calf and thigh Massager (Black)
₹ 6199 | $hotDeals->merchant_name
ARG HEALTH CARE Leg Massager for Pain Relief Foot, Calf and Leg Massage with Vibration and Heat Therapy (Golden)
ARG HEALTH CARE Leg Massager for Pain Relief Foot, Calf and Leg Massage with Vibration and Heat Therapy (Golden)
₹ 15499 | $hotDeals->merchant_name