Happy Valentines Day 2025: साथ दे तू मला..! WhatsApp द्वारे प्रेमदिवसाच्या जोडीदाराला मराठीतून द्या प्रेममय शुभेच्छा

HIGHLIGHTS

फेब्रुवारी महिना किंवा व्हॅलेंटाईन वीक सुरु झाल्यापासून Valentines Day ची प्रतीक्षा असते.

व्हॅलेंटाइन्स डे ला सर्व प्रेमी युगल आपल्या प्रेमाचे नाते साजरा करतात.

WhatsApp द्वारे प्रेमदिवसाच्या द्या तुमच्या जोडीदाराला मराठीतून शुभेच्छा

Happy Valentines Day 2025: साथ दे तू मला..! WhatsApp द्वारे प्रेमदिवसाच्या जोडीदाराला मराठीतून द्या प्रेममय शुभेच्छा

Happy Valentines Day 2025: अखेर तो दिवस उजाडला…! अनेक प्रेमी युगल फेब्रुवारी महिना किंवा व्हॅलेंटाईन वीक सुरु झाल्यापासून Valentines Day ची प्रतीक्षा करत आहेत. जेणेकरून तुम्ही आपल्या जोडीदारासह प्रेमदिवसानिमित्त आपले नाते साजरे करू शकता. या दिवशी अनेक प्रेमी आपल्या जोडीदाराला म्हणजेच प्रियकर/प्रेयसीला आनंदी करण्यासाठी अनेक योजना बनवतात. जसे की, बाहेर फिरायला जाणे, भेटवस्तू देणे इ. मात्र, यासह तुम्ही सर्वप्रथम तुमच्या पार्टनरला व्हॅलेन्टाईन्स डे च्या शुभेच्छा देणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुमचे पार्टनर तुमच्यापासून लांब राहत असतील तर तुम्ही WhatsApp द्वारे Valentines Day च्या शुभेच्छा देऊ शकता.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Valentine’s Day 2025: थिएटर आणि OTT वर जबरदस्त चित्रपट आणि सिरीज होणार रिलीज, व्हॅलेंटाईन बनेल खास!

या रिपोर्टमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी Valentines Day च्या 10+ मराठीतून शुभेच्छा घेऊन आलो आहोत. या गोड शुभेच्छांसह तुमच्या प्रेमदिवसाची सुंदर सुरुवात करा.

Happy Valentines Day 2025 Wishes in Marathi

  • तुझे प्रेमाने बघणे, तुझे खट्याळ हसणे, तुझ्या त्या सुंदर स्मिताने मला आकर्षित करणे. हे सुंदर क्षण नेहमी असेच राहावे. व्हॅलेन्टाईन्स डे च्या प्रेममय शुभेच्छा!
  • अजूनही पुस्तकात सांभाळून ठेवल्या आहेत, तू दिलेल्या गुलाबाच्या पाकळ्या….होऊ दे प्रेमाचा वर्षाव आणि आज होऊन जाऊ दे भावना मोकळ्या…
  • आपल्यात कितीही असू दे दुरावा… पण प्रेम असू दे पुरा! प्रेमदिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छा
Happy Valentines Day wishes
  • नेहमीच तुझे माझ्या स्वप्नात येणे, हेच आहे का आपल्या प्रेमाचे प्रमाण? असतोस/असतेस तू ध्यानी-मनी, नक्की आहे तरी काय आपली प्रेमकहाणी? हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे!
  • सतत छेडीता सूर तुझे…मी सदैव गाते/गातो गाणे तुझे, हे प्रेमही सदैव असेच राहो…तुझ्या माझ्या प्रेमाला कुणाची दृष्ट न लागो. हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे!
  • प्रेम म्हणजे मैत्री… मैत्री म्हणजेच प्रेम, मैत्रीपासून सुरु झालेले हे गोड नाते आयुष्यभर बहरू दे. प्रेमदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा!
  • तुझ्याशिवाय माझे जगणे सुद्धा झाले कठीण, काय आहे तुझ्या मनात एकदा मला पण सांगशील? या प्रेमदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!
  • तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच/तुझाच आहे. प्रेमदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा!
  • कृष्णाने राधेवर जसे प्रेम केले, अगदी तसेच प्रेम मलाही तुझ्यावर करत राहायचे आहे. या प्रेमदिवसाला हे वचन देतो/देते मी तुला. हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे!
  • तू माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम आहेस. चल या प्रेमाच्या ऋतूत सुंदर क्षण जगुयात… व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
  • संपूर्ण हृदयात तुझे प्रेम वसले आहे… आता दुसऱ्या कुणाला जागा ही नाही…तू मान किंवा नको मानू… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे!
  • जगातील सर्वात सुरक्षित स्थान म्हणजे तुझी मिठी…तुझ्या मिठीत शेवटचा श्वास घेण्याचे भाग्य मला लाभो. प्रेमदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
  • या व्हॅलेंटाईन डे ला तुझे माझे प्रेमाचे नाते आणखी बहरू दे! तूच माझे संपूर्ण जग आहेस, हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ दे. हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे!
  • असं नाहीये की तुझ्याशिवाय मला दुसरं कुणी मिळत नाही. या व्हॅलेंटाईन डे ला फक्त एवढंच सांगतो/सांगते की तुझ्यावर प्रेम करण्यापासून फुरसत मिळतच नाही.
  • प्रेमाच्या जादूने तुझ्या हृदयाचा प्रत्येक कोपरा, केवळ आजच नाही तर दररोज भरू दे, आजन्म मला तुझे असेच प्रेम मिळू दे. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
  • डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आण, किती प्रेम करतो/करते तुझ्यावर हे माझ्या नजरेतून जाण! प्रेमदिवसाच्या शुभेच्छा
  • जिंकूनि प्रेमाचा खेळ पुन्हा मला हरायचे नाही, कस सांगू प्रिया तुला तुझ्याशिवाय आता जगायचेच नाही. हॅपी व्हॅलेन्टाईन्स डे!
  • जरा एकदा प्रेम करुन बघ, जरा एकदा मनाचं ऐकून बघ, जरा एकदा मोकळा श्वास घेऊन बघ, कधी स्वत:चा विचार न करता त्याग करुन बघ… जरा एकदा प्रेम करुन बघ… व्हॅलेन्टाईन्स डे च्या शुभेच्छा!
Happy Valentines Day 2025 Wishes in Marathi

व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त WhatsApp स्टेटससाठी व्हीडिओ डाउनलोड करा.

  • सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या व्हॅलेन्टाईन्स डे व्हीडिओची लिंक कॉपी करा.
  • त्यानंतर गुगल सर्चवर जा. ‘युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड अशाप्रकारे सर्च करा.
  • त्यानंतर, आता तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स मिळतील.
  • त्यातील एखादी योग्य साईट निवडून ओपन करा आणि तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक येथे पेस्ट करा.

अशाप्रकारे अगदी सोप्या प्रक्रियेने तुम्ही मोफतमध्ये व्हॅलेन्टाईन्स डे निमित्त डाउनलोड करा. हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स विभागात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल. या व्हीडिओ तुम्ही WhatsApp स्टेटसला ठेऊन व्हॅलेन्टाईन्स डे विश करता येईल.

Meta AI द्वारे व्हॅलेंटाइन्स डे फोटोज तयार करा.

आपणा सर्वांना माहितीच आहे की, Meta AI फीचर WhatsApp आणि Instagram वर उपलब्ध आहे. यावर कमांड देऊन तुम्ही Happy Valentines Day 2025 इमेजेस तयार करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये WhatsApp ओपन करावे लागेल.
  • होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला Meta AI चा ब्लु आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा.
  • या ब्लु आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही Meta AI ला कमांड द्या. उदा. Happy Valentines Day 2025

आता Meta AI एक फोटो तयार करेल आणि तुम्हाला देईल. तुम्ही Meta AI ला कमांड देऊन हे Happy Valentines Day 2025 इमेजेस कस्टमाइज करून घेऊ शकता. या प्रक्रियांद्वारे तुम्ही स्टिकर्स देखील बनवू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo