Shiv Jayanti Wishes 2025: शिवाजी महाराज म्हणजेच प्रत्येक मराठी माणसाचा आदर्श! जयंतीला WhatsApp वर द्या खास शुभेच्छा
दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.
शिवजयंतीनिमित्त WhatsApp वर प्रत्येकाच्या स्टेटसला शुभेच्छा दिसतात.
शिवजयंतीनिमित्त WhatsApp शुभेच्छांची यादी तयार केली आहे.
Shiv Jayanti Wishes 2025: दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. शिवाजी जयंतीला देशभरात मोठा जल्लोष असतो. महाराजांचे भक्त शिवाजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. होय, शिवजयंतीला ठिकठिकाणी ढोल ताशाच्या गजरात महाराजांची पालखी आणि मिरवणूक काढली जाते. ठिकठिकाणी ढोल ताशाच गजर सुरु असतो. शिवजयंतीनिमित्त WhatsApp वर प्रत्येकाच्या स्टेटसला शुभेच्छा दिसतात.
आम्ही देखील या रिपोर्टमध्ये खास तुमच्यासाठी शिवजयंतीनिमित्त शुभेच्छांची यादी तयार केली आहे. त्याबरोबरच, WhatsApp स्टेटस, मेटा AI द्वारे फोटो आणि स्टिकर तयार करणे इ. बद्दल देखील माहिती दिली आहे. पाहुयात शुभेच्छांची यादी-
Shiv Jayanti Wishes 2025
- सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार चोहीकडे रुजू दे! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
- अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अफजल खान फार झाले, आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
- शूरता हा माझा आत्मा, विचार आणि विवेक ही माझी ओळख, क्षत्रिय हा माझा धर्म, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत..शिवजयंतीच्या शुभेच्छा!
- चारी दिशांमध्ये ज्याचा गाजा-वाजा, एकच होता असा राजा, नाव त्याचं घेऊ किती म्हणतात त्याला छत्रपती! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
- स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास, रयतेचे सुख ही एकच मनी होती आस, मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा होता तो छावा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- रणांगण दणाणले, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच छत्रपती शिवराय!
- एक मराठा लाख मराठा, शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
- इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
- जगातील एकमेव राजा असा, ज्यांनी स्वतःसाठी एकही राजवाडा आणि महल बांधला नाही, तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज, शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ..शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- स्त्रित्रांचा जो ठेवितो आदर, ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे.. शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !
WhatsApp स्टेटससाठी व्हीडिओ डाउनलोड करा
- सर्वप्रथम सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या शिव जयंतीच्या आवडलेल्या व्हीडिओची लिंक कॉपी करा.
- आता गुगल सर्चवर जाऊन युट्युब व्हीडिओ डाउनलोड किंवा इंस्टाग्राम व्हीडिओ डाउनलोड अशाप्रकारे सर्च करा.
- आता तुम्हाला व्हीडिओ डाउनलोड करण्यसाठी स्क्रीनवर अनेक मोफत साईट्स मिळतील.
- एखादी योग्य साईट निवडून ओपन करा आणि तुमच्या आवडत्या व्हीडिओची लिंक पेस्ट करा.
- या अगदी सोप्या प्रक्रियेने तुम्ही मोफतमध्ये व्हीडिओ डाउनलोड करा. हा व्हीडिओ तुमच्या फोनच्या डाऊनलोड्स विभागात किंवा गॅलरीमध्ये सेव्ह होईल.
आता तुम्ही गॅलरीमधून हा व्हीडिओ WhatsApp स्टेटसला ठेऊ शकता. अशाप्रकारे स्टेटसद्वारे शिवाजी जयंतीच्या प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा.
Meta AI द्वारे शिवजयंतीच्या शुभेच्छांसाठी फोटोज तयार करा.
- Meta AI फीचर WhatsApp आणि Instagram वर उपलब्ध आहे. यावर कमांड देऊन तुम्ही Shiv Jayanti 2025 इमेजेस तयार करू शकता.
- तुम्हाला तुमच्या डिव्हाइसमध्ये WhatsApp ओपन करावे लागेल. होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला Meta AI चा ब्लु आयकॉन दिसेल.
- या ब्लु आयकॉनवर क्लिक करा. मग तुम्ही Meta AI ला कमांड द्या. उदा. Shiv Jayanti 2025 Images
- आता Meta AI एक फोटो तयार करेल आणि तुम्हाला देईल. तुम्ही Meta AI ला कमांड देऊन हे Shiv Jayanti 2025 इमेजेस कस्टमाइज करून घेऊ शकता.
वरील समान प्रक्रिया तुम्ही स्टिकर्ससाठी देखील फॉलो करू शकता. शिवजयंतीच्या महाराजांच्या सर्व भक्तांना ‘डिजिट मराठी’ कडून हार्दिक शुभेच्छा!
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile