आता सलमान बनून तुम्हीही खेळू शकता ’प्रेम रतन धन पायो’ गेम

आता सलमान बनून तुम्हीही खेळू शकता ’प्रेम रतन धन पायो’ गेम
HIGHLIGHTS

ह्याला हंगामा डिजिटल सर्विसेसने बनवले आहे,जो एक्शन गेम आहे. ह्या कंपनीने ह्याआधी ‘हॅप्पी न्यू ईअर’ वर सुद्धा गेम बनवला होता.

सलमान खानचा चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ अलीकडेच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. आणि आता ह्या चित्रपटावर आधारित एक अॅनड्रॉईड गेमसुद्धा आणला आहे. ह्या गेममध्ये आपण सलमान खान बनून लढाई करु शकता. ह्याला हंगामा डिजिटल सर्विसेसने बनवले आहे,जो एक एक्शन गेम आहे. ह्या कंपनीने ह्याआधी ‘हॅप्पी न्यू ईअर’ वर सुद्धा गेम बनवला होता.

 

ह्या गेमला यूजर गुगल प्ले स्टोअरवर मोफत डाऊनलोड करु शकता. ह्या गेममध्ये सलमान तलवारीने लढाई करतोय, हा गेम अॅनड्रॉईडसह iOS आणि विंडोज यूजर्ससाठीही उपलब्ध आहे. ह्या गेममध्ये शानदार ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. हे ग्राफिक्स HD आहे.

गेममध्ये प्रेम नावाचे पात्र आहे, जो आपल्या कुटूंबावर खूप प्रेम करतो. अशातच त्याचे कुटूंब जेव्हा संकटात येते तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी तो शत्रूंशी सामना करतो. लढाईच्या अनेक पाय-या आहेत. जसजसा प्रेम पुढील स्तरात जातो, तसतसा गेम अजून कठीण होत जातो. प्रेम शत्रूंशी तलवारीने लढाई करतो.

 

गुगल प्ले स्टोरच्या रिव्ह्यूविषयी बोलायचे झाले तर, अशी माहिती मिळाली आहे की, ही बातमी बनवायच्या आधी ४३३ लोकांनी ह्या गेमला ४.४ रेटिंग दिली आहे. ह्या गेमचा आकार 42MB आहे, ज्याला ५००पेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केले गेले आहे. गेमचे सध्याचे व्हर्जन 2.0 आहे. ह्या गेमला इन्स्टॉल करण्यासाठी अॅनड्रॉईड व्हर्जन 2.3 किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo