Chhava OTT Release Date: विकी कौशलचा विक्रमी चित्रपट ऑनलाईन केव्हा आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या अपडेट्स

Chhava OTT Release Date: विकी कौशलचा विक्रमी चित्रपट ऑनलाईन केव्हा आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या अपडेट्स
HIGHLIGHTS

छावा चित्रपट मागील आठवड्यात 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला.

चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांतच कमाईच्या बाबतीत 100 कोटींचा आकडा पार केला.

अनेक सिनेरसिक या चित्रपटाच्या OTT रिलीजची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

Chhava OTT Release Date: सध्या सर्वत्र बॉलीवूडचा प्रसिद्ध आणि आघाडीचा अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट मागील आठवड्यात 14 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज केला गेला. आम्ही तुम्हाला सांगतो की, छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांतच कमाईच्या बाबतीत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. यासह हा चित्रपट विकी कौशलचा विक्रमी चित्रपटांपैकी एक झाला आहे. लोकांच्या तोंडी भाषणाने असे वातावरण निर्माण केले की चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी केली. इतिहासावर आधारित बॉलिवूड चित्रपटांमध्ये विकीचा हा चित्रपट आघाडीवर आहे.

सध्या हा चित्रपट थिएटरमध्ये असल्यामुळे राजेंचे भक्त आणि विकीचे चाहते मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहात हजेरी लावत आहे. सोशल मीडियावर जिकडे तिकडे या चित्रपटाची चर्चा आहे. एवढेच नाही तर, चाहत्यांनी चित्रपटाच्या बॅनरवर दुग्धाभिषेक देखील केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, चित्रपटाच्या तिकीटा जरा महाग असल्यामुळे अनेक सिनेरसिक या चित्रपटाच्या OTT रिलीजची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. छावाच्या OTT रिलीजबद्दल अनेक बातम्या देखील पुढे येत आहेत. जाणून घ्या तपशील-

chhava ott release (image credit: instagram)

Also Read: Chhatrapati Shivaji Maharaj Movies: केवळ छावाच नाही तर, महाराजांवर आधारित ‘या’ चित्रपटांनी देखील गाजवले थिएटर, OTT वर उपलब्ध

Chhava OTT Release Date

आम्ही तुम्हाला सांगतो की, ओटीटीप्लेच्या वृत्तानुसार, छावा हा चित्रपट प्रसिद्ध OTT प्लेटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या OTT वरील अधिकृत रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अलीकडील ट्रेंडनुसार, बॉलीवूड चित्रपट सामान्यतः त्यांच्या थिएटर पदार्पणाच्या 45 ते 60 दिवसांच्या आत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर येतात. अशा परिस्थितीत छावा चित्रपट एप्रिल 2025 च्या सुरुवातीला Netflix वर प्रदर्शित केला जाईल, अशी शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी पाहता, त्याच्या OTT रिलीजकडे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. चाहते लवकरच Netflix कडून अपडेटची अपेक्षा करू शकतात.

Chhava कास्ट

अर्थातच या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. बॉलीवूड आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. तसेच, अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत, तर दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. ‘छावा’ या पुस्तकापासून प्रेरित हा चित्रपट संभाजी महाराजांच्या धाडसी प्रवासाचा आणि मराठा साम्राज्यासाठीच्या त्यांच्या अटळ लढ्याचा आढावा घेतो.

Chhava चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

Chhava चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

130 कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटसह ‘छावा’ ने 31 कोटी रुपयांची जोरदार भव्य सुरुवात केली आहे. ज्यामुळे विकी कौशलचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग असलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आधीच इतर जबरदस्त ऐतिहासिक चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड तोडले आहेत. अजूनही चित्रपट थिएटरमध्ये सुरु असल्यामुळे, आपण अधिकाधिक आकड्यांची अपेक्षा करू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo