V-Moda ने भारतात लाँच केले नवीन हेडफोन्स

V-Moda ने भारतात लाँच केले नवीन हेडफोन्स
HIGHLIGHTS

ऑडियो स्पेशालिस्ट V-Moda ने आपल्या नव्या Crossfade वायरलेस हेडफोनला भारतात लाँच केले आहे. हे हे़डफोन्स आपल्याला वायरलेस आणि वायर्ड अशा दोन्ही मोड्समध्ये उत्कृष्ट संगीताचा आनंद देण्याचा अनुभव देईल.

ह्या नवीन हेडफोनच्या माध्यमातून आपण दोन्ही प्रकारे संगीताचा भरपूर आनंद घेऊ शकता. हा वायरलेस आणि वायर्ड दोन्ही प्रकारात काम करतो. ह्यात आपण Headphonezone.in च्या माध्यमातून २४,९९० रुपयात खरेदी करु शकता. हायब्रिड डिझाइन असलेले हे नवीन हेडफोन्स आपल्या मागील हेडफोन्स Crossfade M100 आणि Crossfade M80 सारखेच आहेत. मात्र हे आधीच्या हेडफोन्सपेक्षाही उत्कृष्ट आहेत. टेक तज्ज्ञांनुसार, हे हेडफोन्स बाजारात असलेल्या Sennheiser, Bose, Beats आणि Sony सारख्या आकर्षक हेडफोन्सशी कडक मुकाबला करु शकतात.

 

ही कंपनी सर्वात खास आणि प्रीमियम हेडफोन्स निर्माण करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. भारतात प्रवेश करण्यासाठी ह्या कंपनीने अनेक दुस-या कंपनींशी भागीदारी केली आहे आणि त्यानंतरच ह्याला भारतीय बाजारात पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. आता पाहायचे हे आहे की, ही आपल्या ह्या नवीन हेडफोन्सना किती पुढे घेऊन जाईल. कंपनीनुसार हे व्हर्जन जे भारतात लाँच केले गेले आहे, हे कंपनीच्या मागील हेडफोन्ससारखा नाही पण ह्याचे रिफाइंड व्हर्जन आहे. हा हेडफोन Crossfade M100 चा रिफाइंड व्हर्जन आहे.

कंपनीच्या CEO वेल Val Kolton यांचे असे म्हणणे आहे की, “ह्या हेडफोन्समध्ये सर्वात आकर्षक फीचर्स दिले गेले आहे. मला हे सांगायला खूप आनंद होतोय की, Crossfade Wireless एक जबरदस्त हेडफोन्स आहे, जो टेक सॅव्ही कंज्यूमर्स, म्यूजिक प्रोफेशनल्स आणि गेमर्ससाठी आकर्षक पर्याय असू शकतो.”

आतापर्यंत लाँच केल्या गेलेल्या सर्व V-Moda हेडफोन्ससारखेच ह्यालाही मेटल बॉडीसह लाँच केले गेले आहे. सर्वात खास गोष्ट ही आहे की, हेडफोन्सची ब्लूटुथ रेंज १० मीटरच्या आसपास आहे. त्याचबरोबर आपण ह्याला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या डिवाइससह जोडू शकतो.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo