OnePlus Nord Buds 2 खरेदी करा अगदी मोफत, कंपनीने आणली अप्रतिम ऑफर !

HIGHLIGHTS

OnePlus द्वारे एक अप्रतिम ऑफर

OnePlus Nord Buds 2 मिळतील अगदी मोफत

OnePlus Nord CE 3 lite स्मार्टफोन 12 एप्रिलपासून खरेदीसाठी उपलब्ध

OnePlus Nord Buds 2 खरेदी करा अगदी मोफत, कंपनीने आणली अप्रतिम ऑफर !

OnePlus द्वारे एक अप्रतिम ऑफर आणण्यात आली आहे, या ऑफर अंतर्गत OnePlus Nord Buds 2 अगदी मोफतमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. खरं तर, कंपनीने OnePlus Nord CE 3 lite स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हे नवे बड्स मोफत दिले जातील. हा फोन 12 एप्रिलपासून दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातील. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

किमंत आणि ऑफर्स 

OnePlus Nord CE 3 lite ची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. फोनच्या खरेदीवर कंपनी 1 हजार रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. 12 ते 15 एप्रिलपर्यंत या सवलतीचा लाभ घेता येईल. हे डिवाइस कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि Amazon वरून खरेदी केले जाऊ शकतात. यासोबतच, हे डिवाइस काही पार्टनर स्टोअर्सवर देखील उपलब्ध असतील. या फोनवर OnePlus Nord Buds 2 फ्री ऑफर फोनचा स्टॉक संपतपर्यंत वैध असेल, असे कंपनीने सांगितले आहे. 

OnePlus Nord Buds 2 

या बड्सची किमंत 2,999 रुपये आहे. हे TWS वायरलेस इयरबड्स आहेत. ज्यामध्ये 12.4mm ड्राइव्हर युनिट्स दिले गेले आहेत. इयरबड्समध्ये आजूबाजूचे गोंधळ कमी करण्यासाठी ANC सपोर्ट देखील दिला गेला आहे. OnePlus Nord Buds 2 या सपोर्टसह येणारे पहिले TWS वायरलेस इयरबड्स आहेत. 

OnePlus Nord CE 3 lite

OnePlus Nord CE 3 lite मध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच, फोनमध्ये 120Hz ऍडॉप्टीव्ह रिफ्रेश रेट सपोर्ट दिला गेला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट सपोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये 108MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्यासोबतच, 67W सुपरवूक अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo