40-तास बॅटरी बॅकअपसह Dizo Buds P भारतात लाँच, 1500 रुपयांपेक्षा कमी किंमत

HIGHLIGHTS

Dizo Buds P भारतात लाँच

बड्ससह 40-तासांच्या बॅटरी बॅकअपचा दावा

Dizo Buds P ची किंमत एकूण 1,599 रुपये

40-तास बॅटरी बॅकअपसह Dizo Buds P भारतात लाँच, 1500 रुपयांपेक्षा कमी किंमत

Realme TechLife च्या ब्रँड Dizo ने Dizo Buds P भारतात लाँच केले आहेत. Dizo Buds P हे कंपनीचे नवीन इयरबड्स आहेत, ज्यात 40 तासांची बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. डिझो बड्स पी मध्ये 13 मिमी ड्रायव्हर्स आहेत आणि प्रत्येक बड्सचे वजन 3.5 ग्रॅम आहे. बड्ससोबत बास बूस्ट+ मिळेल आणि गेमिंगसाठी 88ms सुपर लो लेटन्सी गेमिंग मोड येईल. Dizo Buds P ची विक्री 5 जुलैपासून फ्लिपकार्टवरून सुरु होईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : BSNL कडून सर्वोत्तम ऑफर! 'या' प्लॅन्सवर मिळतेय 1200 रुपयांची सूट, लगेच लाभ घ्या

Dizo Buds P ची किंमत 

Dizo Buds P ची किंमत 1,599 रुपये आहे, परंतु लॉन्चिंग ऑफर अंतर्गत ते 1,299 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. हे उपकरण डायनॅमो ब्लॅक, मार्बल व्हाईट आणि शेडी ब्लू कलर ऑप्शन्समध्ये 5 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवरून विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती मिळाली आहे. 

 Dizo Buds P चे स्पेसिफिकेशन्स 

बड्सचे वजन 3.5 ग्रॅम आहे. बड्समध्ये 13 मिमी ड्रायव्हर आहे. बड्ससह हेवी बाससाठी बास बूस्ट+ देण्यात आले आहे. यामध्ये एन्व्हायर्मेंटल नॉइज कॅन्सिलेशन देखील देण्यात आले आहे. बेस्ट गेमिंगसाठी 88ms चा लो लेटेन्सी मोड देखील आहे. या बड्ससह टच कंट्रोल आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला म्युझिक प्ले करता येईल.

हे बड्स Realme Link ऍपशी कनेक्ट करता येतील. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये v5.3 देण्यात आला आहे. याला वॉटर रेझिस्टंटसाठी IPX4 रेटिंग मिळाले आहे. बड्सच्या बॅटरीबाबत 40 तासांचा बॅकअप असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्येक बडची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सात तास चालते. यासोबत फास्ट चार्जिंग देखील आहे, 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर चार तासांच्या बॅकअपचा दावा आहे. चार्जिंगसाठी यात टाइप-C पोर्ट आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo