अप्रतिम ऑफर ! Amazon चा ‘हा’ स्मार्ट स्पीकर 10 दिवस वापरून बघा, आवडला नाही तर पैसे वापस

अप्रतिम ऑफर ! Amazon चा ‘हा’ स्मार्ट स्पीकर 10 दिवस वापरून बघा, आवडला नाही तर पैसे वापस
HIGHLIGHTS

Amazon Echo Dot स्मार्ट स्पीकरवर Amazonची विशेष ऑफर

स्मार्ट स्पीकर पूर्ण 10 दिवस वापरून आवडत नसल्यास परत करता येईल.

यानंतर, तुमचे पैसे सहज परत मिळतील.

लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon देखील ग्राहकांना अनेक स्मार्ट प्रोडक्ट्स ऑफर करतो, ज्यामध्ये फायरटीव्ही स्टिक आणि किंडल ई-बुक रीडर्सपासून ते Amazon इको स्मार्ट स्पीकरच्या विस्तृत श्रेणी आहेत. तुम्हाला नवीन स्पीकर विकत घ्यायचा असेल, पण तुम्हाला अलेक्सा सपोर्ट असलेल्या स्मार्ट स्पीकरबद्दल शंका आहे, तर कंपनीने त्यासाठी अप्रतिम ऑफर आणली आहे.

हे सुद्धा वाचा : Vivo चा प्रीमियम फोन झाला स्वस्त! कंपनीची अधिकृत वेबसाइटवर भारी सूट

विशेष ऑफर म्हणून Amazon आपल्या ग्राहकांना Amazon Echo Dot स्मार्ट स्पीकर पूर्ण 10 दिवस वापरण्याचा पर्याय देत आहे. जर या 10 दिवसांत त्यांचा स्मार्ट स्पीकरचा अनुभव चांगला नसेल, तर कंपनी पैसे परत करेल आणि प्रोडक्ट कोणत्याही प्रश्नाशिवाय परत घेण्यात येईल. ऍमेझॉनला त्याच्या स्मार्ट स्पीकर रेंजमध्ये एवढी खात्री आहे की ती ग्राहकांना नक्कीच आवडेल, असा कंपनीला विश्वास दिसतोय.

 Amazon Echo Dot ची किंमत आणि ऑफर 

Amazon वर अनेक इको डॉट मॉडेल्स सूचीबद्ध आहेत, ज्यांच्या किंमती 3,499 रुपयांपासून सुरू होतात. Echo Dot (3rd Gen) 22 टक्के सूट देऊन 4,499 रुपयांऐवजी 3,499 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय इको डॉट (4th Gen) 11 टक्के सवलतीनंतर 4,499 रुपयांऐवजी 3,999 रुपयांना खरेदी करता येईल. HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डसह यावर अतिरिक्त 5% सूट आहे.

साहजिकच, स्मार्ट स्पीकर वापरून पाहण्यासाठी प्रथम तो विकत घ्यावा लागेल. यानंतर, 10 दिवसांच्या वापर केल्यानंतर तुम्ही तुमच्या अनुभवानुसार निर्णय घेऊ शकता. तुमची इच्छा असल्यास हा स्मार्ट स्पीकर वापरणे सुरू ठेवा आणि ते परत करू नका. अनुभव चांगला नसेल तर परत करता येतो. तुम्ही दिलेली कोणतीही रक्कम तुम्हाला सहज परत केली जाईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo