आता YouTube Shorts ने देखील होणार कमाई, YouTube ने आणला नवा पार्टनर प्रोग्राम

HIGHLIGHTS

यु- ट्युबर्सची मज्जाच मजा

YouTube Shorts देखील मॉनिटाईझ करता येणार आहेत

शॉर्ट्स व्हीडिओ मॉनिटाईझ करण्यासाठी YouTubers ला किमान 1,000 सदस्यांची आवश्यकता

आता YouTube Shorts ने देखील होणार कमाई, YouTube ने आणला नवा पार्टनर प्रोग्राम

Tiktok या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर आता YouTube ने देखील मॉनिटायझेशन प्रोसेस सुरू केली आहे. म्हणजेच आता यूट्यूब शॉर्ट्सवरही जाहिराती लावता येणार आहेत. याआधी यूट्यूबवर टिकटॉक सारख्या छोट्या व्हिडिओंचा ट्रेंड सुरू झाला होता. Tiktok मधील अनेक त्रुटींमुळे, भारत सरकारने 29 जून 2020 रोजी त्यावर बंदी घातली. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Realme चा 6000mAh बॅटरी असलेला पावरफुल स्मार्टफोन 9 हजार रुपयांपेक्षा स्वस्त, जाणून घ्या ऑफर

YouTube शॉर्ट्सवरील मॉनिटायझेशन प्रोसेस, YouTube वापरकर्त्यांना YouTube सोबत अधिक कमाई करण्याची संधी देखील मिळेल. युट्युबने याआधीच शॉर्ट्स फंडची घोषणा केली आहे. पण फक्त काही युट्युबर्सना याचा लाभ मिळत होता. आता युट्यूब पार्टनर प्रोग्रामअंतर्गत शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएटर्सनाही लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, YouTube लवकरच त्याच्या शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅट YouTube Shorts साठी पार्टनर प्रोग्राम सुरू करण्याची शक्यता आहे.

शॉर्ट्स व्हीडिओ मॉनिटाईझ करण्यासाठी YouTubers ला किमान 1,000 सदस्यांची आवश्यकता असेल. एका वर्षात 4,000 तासांचा वॉच टाईमही पूर्ण करावा लागेल. तसेच, गेल्या 3 महिन्यांत 10 दशलक्ष किंवा त्याहून अधिक व्ह्यूज असलेले YouTubers मॉनिटायझेशनसाठी पात्र आहेत आणि अर्ज करू शकतात. YouTube च्या ऍड शेअरिंग प्रक्रियेअंतर्गत, 45 टक्के कमाई निर्मात्यांना आणि 55 टक्के YouTube ला जाईल. 

इंस्टाग्राम देखील करतोय कॉपी 

यूट्यूबसोबतच इंस्टाग्रामही शॉर्ट व्हिडीओ फॉरमॅटमध्ये सातत्याने बदल करत आहे. अलीकडे, इंस्टाग्राम देखील टिकटॉकचे फीचर कॉपी करण्यासाठी अडचणीत आले होते. वास्तविक, इंस्टाग्रामने नवीन फीचर म्हणून फुल स्क्रीन व्हिडिओ फीड जारी केले होते, ज्यामुळे इंस्टाग्रामवर टिकटॉकचे फीचर कॉपी केल्याचा आरोप झाला होता. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo