भारतीयवंशी नील मोहन YOUTUBE चे नवे CEO, ज्यांना थांबवण्यासाठी Google ने दिले होते कोट्यवधी

भारतीयवंशी नील मोहन YOUTUBE चे नवे CEO, ज्यांना थांबवण्यासाठी Google ने दिले होते कोट्यवधी
HIGHLIGHTS

गुगलने नील मोहन यांची YouTube चे नवे CEO म्हणून नियुक्ती केली आहे.

यूट्यूबच्या सीईओ Susan Wojcicki यांनी 16 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला.

नील मूळचे भारतीय असून ते या कंपनीशी 15 वर्षांपासून संबंधित आहे.

Google च्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube च्या CEO सुसान वोजिकी यांनी काल म्हणजेच 16 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला. त्यांच्या जागी गुगलने भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक नील मोहन यांची यूट्यूबचे नवे CEO म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवारी राजीनामा देणारे वोजिकी गेल्या नऊ वर्षांपासून व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube चे नेतृत्व करत होते. मूळ कंपनी अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांसारख्या दिग्गज व्यावसायिक नेत्यांच्या यादीत भारतीय वंशाचे नील मोहन सामील झाले आहेत. एवढेच नाही तर नील मोहन यांना ट्विटरकडे जाऊ न देण्यासाठी गुगलने काही वर्षांपूर्वी 544 कोटी रुपये खर्च केले होते. चला, नील मोहनबद्दल जाणून घेऊया…

हे सुद्धा वाचा : अविश्वसनीय ! फक्त 141 रुपयांमध्ये वर्षभराच्या रिचार्जची सुट्टी, मोफत कॉल आणि दररोज इंटरनेट 

कोण आहेत भारतीयवंशी नील मोहन ? 

YouTube चे नवीन CEO नील मोहन अमेरिकेतील मिशिगन आणि फ्लोरिडा येथे वाढले. त्यांनी 1996 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. पुढे त्याच विद्यापीठातून त्यांनी ए.बी.ए. केले. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला नील मोहन Accenture या सॉफ्टवेअर सेवा कंपनीशी संबंधित होते. त्यानंतर अनेक आयटी कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर नील 2008 मध्ये गुगलचा कर्मचारी बनले. YouTubeचे CEO होण्यापूर्वी ते चीफ प्रोडक्ट ऑफिसर म्हणून काम करत होते.

YouTube चे नवीन CEO नील मोहन यांना तंत्रज्ञानाची चांगली जाण आहे, तसेच ते व्यवसाय धोरण बनवण्यात तज्ञ मानले जातात. आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात नीलने YouTube च्या कमाई धोरणात अनेक बदल केले आहेत. 

 

 

Google ने दिले कोट्यवधी 

आम्ही तुम्हाला सांगतो की, 2008 मध्ये नील 'डबल क्लिक' नावाच्या कंपनीत काम करत होते. गुगलने डबल क्लिकचा ताबा घेतला. 2013 मध्ये, Google ने नीलला ऍडव्हर्टायझिंग प्रोडक्ट्सचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. त्याच वर्षी ट्विटरने नीलला ऑफर दिली. गुगलच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी नीलला त्यावेळी 100 मिलियन डॉलर म्हणजेच 544 कोटी रुपयांचा बोनस दिला होता. कंपनी न सोडल्यामुळे नीलला गुगलने हा बोनस दिला होता. $100 दशलक्ष मिळवणारे नील हे कंपनीचे चेअरमन एरिस श्मिट व्यतिरिक्त एकमेव व्यक्ती आहेत, असे म्हटले जाते. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo