WhatsApp: नवीन ‘Search by date’ फिचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट, तारखेवरून ‘अशा’प्रकारे शोधा Important मॅसेजेस। Tech News 

WhatsApp: नवीन ‘Search by date’ फिचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट, तारखेवरून ‘अशा’प्रकारे शोधा Important मॅसेजेस। Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp वर Search by date फीचर Android आणि iOS या दोन्ही वापरकर्त्यांसाठी रोलआऊट

CEO मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या WhatsApp चॅनलवर या फीचरची माहिती दिली.

यूजर्स आता कोणत्याही चॅटमधील महत्त्वाचे मेसेज सहज शोधू शकतात.

मागील काही दिवसांपासून WhatsApp वर सर्च बाय डेट फीचरची चर्चा सुरु होती. आता हे बहुचर्चित फीचर अखेर सर्व युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या WhatsApp चॅनलवर या फीचरची माहिती दिली आहे. नवीन फिचर वापरणे खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या फिचरबद्दल सविस्तर माहिती-

हे सुद्धा वाचा: Samsung च्या Popular 5G फोनचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News

Find WhatsApp messages faster: Here's how to use Search by Date feature

WhatsApp Search by date

Search by date फिचर वापरकर्त्यांना चॅटमध्ये विशिष्ट तारीख निवडून संदेश शोधण्याची अनुमती देईल. याच्या मदतीने यूजर्स आता कोणत्याही चॅटमधील महत्त्वाचे मेसेज सहज शोधू शकतात. फीचरच्या मदतीने यूजर्स संपूर्ण चॅटमधील सर्व मेसेज स्किप करू शकतील आणि विशिष्ट तारखेचे मेसेज शोधण्यास सक्षम असतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फिचर Android आणि iOS या दोन्ही वापरकर्त्यांसाठी जागतिक स्तरावर आणले गेले आहे. नवीन फीचर वापरण्यासाठी युजर्सना आधी ॲप अपडेट करावे लागेल. WhatsApp वेब वापरकर्त्यांसाठी आणि मॅक डेस्कटॉपसाठी देखील हे फिचर लाईव्ह झाले आहे.

जाणून घ्या Search by date वापरण्याची Android आणि iOS या दोन्ही वापरकर्त्यांसाठी संपूर्ण प्रक्रिया:

iPhone युजर्स ‘अशा’प्रकारे फिचरचा वापर करा.

  • सर्च बाय डेट फीचर वापरण्यासाठी iPhone युजर्सना आधी ते चॅट ओपन करावे लागेल, ज्यात मेसेज शोधायचा आहे.
  • त्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. हे केल्यानंतर, तुम्हाला प्रोफाइल इन्फो सेक्शनमध्ये सर्च ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • आता स्क्रीनच्या बॉटमला उजव्या बाजूला एक कॅलेंडर चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करताच सर्व तारखांचा पर्याय दिसेल.
  • आता तुम्हाला मेसेज शोधायचा आहे, ती तारीख निवडा. त्यानंतर जंप टू डेट वर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण चॅटमधील सर्व मॅसेज वगळून थेट त्या तारखेच्या चॅटवर पोहोचणार आहात.

Android वापरकर्त्यांनी अशाप्रकारे फिचर वापरा.

  • अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी, चॅट उघडल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर कॅलेंडर चिन्हावर क्लिक करा आणि तारीख निवडा.

अशा प्रकारे अगदी सोप्या रीतीने आपण तारखेनुसार संदेश शोधण्यास सक्षम असाल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo