सर्वात मोठे टेंशन संपले ! Whatsapp वर येणार नवीन फीचर, ‘या’ गोष्टी युजर्सना आता स्वतः सांगणार

सर्वात मोठे टेंशन संपले ! Whatsapp वर येणार नवीन फीचर, ‘या’ गोष्टी युजर्सना आता स्वतः सांगणार
HIGHLIGHTS

Whatsapp वर नवीन Chatbot फिचरची टेस्टिंग सुरु

नवीन फीचर्सची सूचना युजर्सना चॅटबॉटद्वारे मिळेल

Chatbot मध्ये फक्त वन-वे कॉम्युनिकेशन असेल

जवळपास आता प्रत्येकी दुसरी व्यक्ती WhatsAppचा वापर करत असते. WhatsApp आपले प्लॅटफॉर्म सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी ऍपमध्ये नवनवीन फिचर जोडत असतो. बर्‍याच वेळा वापरकर्त्यांना नवीन फिचरवर लक्ष ठेवणे थोडे कठीण होते. त्यामुळे, बरेच वेळा युजर्सना नवीन फिचरबद्दल कल्पना नसते. पण व्हॉट्सऍप लवकरच लोकांचे हे टेंशन संपवणार आहे.  WhatsApp नवीन Chatbot फीचरची टेस्टिंग करत आहे, जो प्रत्येक वेळी ऍपमध्ये नवीन फिचर आल्यावर तुम्हाला सूचित करेल. चला तर बघुयात हे अप्रतिम फिचर कसे कार्य करेल… 

हे सुद्धा वाचा : कंपनीकडून OnePLus 10T चे फीचर्स कन्फर्म, 50 MP कॅमेरासह मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स

Chatbot वापरकर्त्यांना 'अशा'प्रकारे मदत करेल

WABetaInfo वेबसाइटनुसार, अधिकृत WhatsApp चॅटबॉट सध्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. ऍपमध्ये नवीन वेरिफाइड चॅटबॉट असेल. चॅटबॉटच्या मदतीने, वापरकर्त्यांना 'नवीन फीचर्स', 'टिप्स आणि ट्रिक्स' आणि 'प्रायव्हसी आणि सेल्फती' बद्दल प्रथम माहिती मिळणार आहे.

Chatbot मध्ये फक्त वन-वे कॉम्युनिकेशन असेल

WhatsApp फक्त त्याच्या प्लॅटफॉर्मवर केवळ बिजनेस अकाउंट व्हेरिफाय करतो. परंतु त्यांच्या विपरीत, तुम्ही या चॅटबॉटला उत्तर देऊ शकणार नाही. हे रीड-ओन्ली अकाउंट असेल, त्यामुळे नेहमी वन-वे कॉम्युनिकेशन असेल. खर तर, चॅटबॉटचा उद्देश केवळ वापरकर्त्यांना व्हॉट्सऍपच्या नवीनतम फीचर्सबद्दल आणि इतर तपशीलांबद्दल माहिती देणे होय. 

'हे' फिचर अद्याप बीटामध्ये आहे

वेबसाईटनुसार, चॅटमध्ये पाठवलेले सर्व मॅसेज एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील. मात्र, याने काही फरक पडत नाही कारण मॅसेज बहुधा एकाच वेळी अनेक वापरकर्त्यांना पफॉरवड केला जाईल. पण रिप्लायचे सपोर्ट दिले जाणार नाही. जर तुम्हाला व्हॉट्सऍप चॅटबॉटचे मॅसेज नको असतील, तर तुम्ही हे अकाऊंट ब्लॉक करू शकता. हे फिचर  अद्याप बीटामध्ये आहे, त्यामुळे बीटा प्रोग्राममध्ये सामील झालेल्या निवडक वापरकर्त्यांना ते दिसत असेल. तोपर्यंत ते सर्वांसाठी प्रसिद्ध होईल की नाही याबाबत सध्या व्हॉट्सऍपने कोणतीही माहिती दिलेली नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo