व्हॉट्सअपमध्ये समाविष्ट झाले नवीन शेअरिंग फीचर

व्हॉट्सअपमध्ये समाविष्ट झाले नवीन शेअरिंग फीचर
HIGHLIGHTS

हे नवीन फीचर 2.12.453 (गुगल प्ले स्टोरवर सध्या उपलब्ध) आणि 2.12.480 (अधिकृत साइटवर उपलब्ध लेटेस्ट वर्जन) मध्ये समाविष्ट केले आहे. त्याचबरोबर यूजर ह्याला व्हॉट्सअपच्या वेबसाइट किंवा गुगल प्ले बीटा टेस्टिंग प्रोग्रामच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकतात.

इस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअपने आपल्या अॅनड्रॉईड यूजर्ससाठी ह्या अॅपमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे. व्हॉट्सअपच्या ह्या नवीन फीचरमध्ये चॅटमधून लिंक कॉपी केल्यावर, चॅट डिलीट केल्यावर जास्त नियंत्रण सारखे अनेक पर्याय यूजर्सला मिळणार आहे. व्हॉट्सअॅपने अॅनड्रॉईड यूजरसाठी शेअर्ड लिंक हिस्ट्री नावाचा एक नवीन टॅब दिला आहे.

 

ही माहिती अॅनड्रॉईड पोलीसने आपल्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे. ह्या रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर 2.12.453 (गुगल प्ले स्टोरवर सध्या उपलब्ध) आणि 2.12.480 (अधिकृत साइटवर उपलब्ध लेटेस्ट वर्जन) मध्ये समाविष्ट केले आहे. त्याचबरोबर यूजर ह्याला व्हॉट्सअपच्या वेबसाइट किंवा गुगल प्ले बीटा टेस्टिंग प्रोग्रामच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकतात.

 

काय खास आहे ह्या नवीन फीचरमध्ये?

  • लेटेस्ट व्हर्जनमध्ये शेअर्ड लिंक हिस्ट्रीसह मिडिया हिस्ट्री टॅबसुद्धा दिला गेला आहे. मिडिया हिस्ट्री टॅबमध्ये शेअर केलेले फोटो आणि व्हिडियो यांचा समावेश आहे.

  • ह्या फीचरने यूजर सहजरित्या आपल्या मित्रांना आणि कुटूंबियांशी शेअर केलेले लिंक स्टार न करता ब्राउज करु शकता.

  • नवीन व्हर्जनमध्ये टॅप आणि होल्ड करुन लिंकला कॉपीसुद्धा केले जाऊ शकते. ह्याआधी अॅनड्रॉईड व्हॉट्सअपमध्ये लिंकला कॉपी केले जाऊ शकत नव्हते आणि पुर्ण चॅटसह URL कॉपी करण्याचाही विकल्प नव्हता.

  • आता अॅनड्रॉईड व्हॉट्सअप यूजरला चॅट हिस्ट्री डिलीट करण्याच्या आधी ३० दिवस किंवा ६ महिन्यांपुर्वीचे चॅट डिलीट करण्याचे विकल्प मिळतील.

  • आता यूजरला चॅट डिलीट करण्याआधी पहिले स्टार मेसेजला सांभाळून ठेवण्यासाठी एक चेकबॉक्स दिसेल.

हेदेखील पाहा – महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 5 अॅप्स

हेदेखील वाचा – फेसबुकने लाँच केला आपला नवीन इमोशन ऑप्शन

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo