‘या’ 5 ऍप्सवर अगदी मोफतमध्ये बघा मुव्ही आणि वेब सिरीज, जाणून घ्या सविस्तर

‘या’ 5 ऍप्सवर अगदी मोफतमध्ये बघा मुव्ही आणि वेब सिरीज, जाणून घ्या सविस्तर
HIGHLIGHTS

मोफतमध्ये OTT कन्टेन्ट बघण्यासाठी '5' ऍप्स फायदेशीर.

इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता नाही.

फक्त साइन इन करा आणि मोफतमध्ये मुव्हीज, वेब सिरीज बघण्याचा आनंद लूटा.

सध्या OTT प्लॅटफॉर्मची क्रेझ भारतात वाढताना दिसत आहे. अनेक नवीन सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना लॉकडाउनच्या काळात OTT प्लॅटफॉर्मचा वापर वाढला असल्याचे दिसून आले आहे. भारतात नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम, झी 5, सोनी लिव्ह, डिझनी प्लस हॉटस्टार यांसारखे इतर अनेक पेड OTT ऍप्स आहेत. या ऍप्सवर आपण सतत मुव्हीज आणि वेब सिरीजचा आनंद घेऊ शकतो. मात्र, हा आनंद घेण्यासाठी तुम्हाला या ऍपचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल. 

मात्र, हे सब्स्क्रिप्शन सर्वांनाच घेता येईल, असे नाही. पण काळजी करू नका, आम्ही तुम्हाला काही खास ऍप्सबद्दल माहिती देणार आहोत, जिथे तुम्हाला मोफतमध्ये मुव्हीज आणि वेब सिरीजचा आनंद घेता येईल. चला तर जाणून घेऊयात पुढील OTT ऍप्सबद्दल सविस्तर माहिती… 

JioCinema : 

Jioचा हा ऍप गुगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करता येतो. यावर युजर सिनेमा, टीव्ही सीरिज पाहू शकतात. हे ऍप अगदी मोफत आहे. तसेच, या ऍपवर अनेक भाषांचा कंटेंट उपलब्ध आहे. 

Voot 

फ्री वेब सीरिज, सीरियल आणि इतर कंटेंट पाहण्यासाठी वूट ऍपदेखील उत्तम पर्याय आहे. तुम्हाला Voot  ऍप गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोरवरुन डाउनलोड करता येईल. त्यानंतर या ऍपमध्ये साइन इन करावे लागेल. फ्री असलेला कंटेंट Voot वर अगदी सहजतेने  पाहता येईल. 

MX Player –

MX Player अनेक वर्षांपूर्वी ऑफलाइन व्हिडीओ प्लेअर स्वरूपात बाजारात  दाखल झालं होतं. त्यानंतर हे ऍप OTT ऍप स्वरूपात बाजारात आले. परंतु हे ऍप पूर्णपणे मोफत आहे. हे ऍप वापरण्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. या ऍपवर 12 भाषांमध्ये कंटेंट उपलब्ध आहे. यावर अनेक वेब सीरिज, पॉप्युलर सीरियल आणि मूव्हीज पाहता येतात.

Plex –

Plex स्ट्रिमिंग सर्विसदेखील फ्रीमध्ये मूव्ही आणि टीव्ही शोज पाहण्याची परवानगी देते. या OTT ऍपवर युजरला  200 हून अधिक लाइव्ह चॅनल्स फ्रीमध्ये पाहता येतात. यात हिंदीमधील अनेक कन्टेन्ट बघायला मिळेल. 

Tubi –

 ज्यांना हॉलिवूड चित्रपटाचा आनंद घ्यायचा असेल, त्यांच्यासाठी Tubi हे ऍप फायदेशीर ठरेल. हे App देखील फ्री अगदी मोफत आहे. Tubi वर अनेक हॉलिवूड मूव्ही पाहता येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo