स्पॅम कमेंट्स बंद करण्यासाठी YouTube वर येणार एक नवीन फिचर, वाचा संपूर्ण तपशील

स्पॅम कमेंट्स बंद करण्यासाठी YouTube वर येणार एक नवीन फिचर, वाचा संपूर्ण तपशील
HIGHLIGHTS

YouTube वर लवकरच महत्त्वाचे फीचर्स येणार

स्पॅम कमेंट्सवर आळा घालण्यासाठी नवीन फिचर काम करेल

YouTube Go ऍप बंद करण्याची घोषणा

गुगलच्या मालकीचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube  एका नवीन फिचरवर काम करत आहे. यूट्यूबचे हे नवीन फीचर सुरू झाल्यानंतर कोणत्याही चॅनल किंवा व्हिडिओवर येणाऱ्या फेक किंवा स्पॅम कमेंटवर आळा बसणार आहे. YouTube ने असेही म्हटले आहे की, चॅनेल चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या यापुढे लपवता येणार नाही. स्पॅम कॉमेंट्सवर आळा घालण्यासाठी, YouTube ने काही शब्द फिल्टर केले आहेत.

हे सुद्धा वाचा : नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? बघा 20 हजारांच्या बजेटमधील काही उत्तम पर्याय

तीन नवे फीचर्स येणार 

YouTube ने आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये तीन नवीन फीचर्स सादर करण्याची घोषणा केली आहे. पहिले फिचर म्हणजे स्पॅम कॉमेंट्सवर अंकुश ठेवणे, दुसरे म्हणजे आपली ओळख लपवून YouTube चॅनेल चालवणाऱ्या किंवा त्यावर कॉमेंट करणाऱ्यांवर अंकुश आणि तिसरे म्हणजे सबस्कारीबर्सची संख्या लपवणे. हे फीचर्स 29 जुलै 2022 पासून सुरू होणार आहे.

यूट्यूबने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही लोक आपली ओळख लपवून कमेंट करतात. असे लोक मुद्दाम इतर कोणतेही चॅनल डाऊन करण्याचा प्रयत्न करतात. असे लोक कोणत्याही चॅनलवर मोठ्या प्रमाणात कमेंट करतात. अशा परिस्थितीत चांगले काम करणारे छोटे चॅनेल्स उद्ध्वस्त होतात. असे काही चॅनेल आहेत जे त्यांचे सब्सक्राइबर्स लपवतात. 29 जुलैपासून यांवर बंदी घालण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी YouTube Go ऍप बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. YouTube Go 2016 मध्ये Android Go आवृत्ती असलेल्या फोनसाठी लाँच करण्यात आले होते. YouTube Go चा साईज खूपच कमी आहे आणि ज्या फोनमध्ये रॅम आणि स्टोरेज कमी आहे, त्यांच्यासाठी हे ऍप एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही.

YouTube ने म्हटले की, YouTube Go या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये बंद होईल, पण ते अचानक बंद होणार नाही. ऑगस्टपासून ते बंद होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर या ऍपला कोणतेही अपडेट मिळणार नाही. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या फोनमध्ये हे ऍप आधीच इन्स्टॉल आहे, ते ते वापरू शकतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo