डिजिटल पेमेंट करण्यासाठी मायक्रोमॅक्सने केली व्हिसा आणि ट्रांसर्वशी भागीदारी

डिजिटल पेमेंट करण्यासाठी मायक्रोमॅक्सने केली व्हिसा आणि ट्रांसर्वशी भागीदारी
HIGHLIGHTS

भारतात डिजिटल पेमेंट्सला आणखी सोपे आणि सुलभ बनविण्यासाठी मायक्रोमॅक्सने व्हिसा आणि मुंबईच्या ट्रांसर्व कंपनीशी भागीदारी केल्याची घोषणा केली आहे.

भारतात डिजिटल पेमेंट्सला अजून सोयीस्कर बनविण्यासाठी मायक्रोमॅक्सने व्हिसा आणि मुंबईच्या ट्रांसर्व कंपनीशी भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. आता आपण मायक्रोमॅक्सच्या मोबाईलवरुनसुद्धा कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट करु शकाल. मात्र हे करण्यासाठी आपल्याला Udio App ची  मदत घ्यावी लागेल, जो ट्रांसर्वने बनवलेला आहे. जर आपल्या फोनमध्ये हा अॅप असेल, तर आपण आपल्या डिजिटल पेमेंट्सला आणखी सोपे बनवू शकाल.

ह्या तीनही कंपन्यांनी ह्यासाठी एक मेमोरेंडमवर सही केली आहे आणि ह्या भागीदारीची घोषणा केली. मात्र ही केवळ मायक्रोमॅक्सच्या फोन्ससाठीच आहे. हे डिजिटल पेमेंट्स व्हिसा आणि ट्रांसर्वद्वारा केले जाईल जे केवळ मायक्रोमॅक्सच्या स्मार्टफोन्सवरच काम करेल.

हेदेखील वाचा – भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?

मायक्रोमॅक्सच्या यूजर्स mVisa चा वापर करुन मोबाईल आधारित पेमेंट्स करु शकाल आणि हा तो मर्चंट सोशल मिडिया दोन्हींवर करु शकाल. त्याशिवाय आपण मायक्रोमॅक्सच्या स्मार्टफोन्सवरुन NFC चा वापर करुन भविष्यातसुद्धा उत्कृष्ट प्रकारे काम करु शकाल.

हेदेखील वाचा – ५००० च्या किंमतीत येणारे दोन बजेट स्मार्टफोन्स

हेदेखील वाचा – फेसबुर लाइव ब्रॉडकास्टमध्ये नवीन फीचर्सचा समावेश

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo