Instagram Down: हजारो वापरकर्ते मेटाचे फोटो शेअरिंग ॲप्लिकेशन Instagram वापरण्यास सक्षम नाहीत. जगभरातील Instagram वापरकर्ते त्यांच्या फीड्स रीफ्रेश करण्यात किंवा मॅसेज पाठवताना येणाऱ्या व्यत्ययाबद्दल तक्रारी करत आहेत. रिअल-टाइम आउटेज-डिटेक्टिंग प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरनुसार, शुक्रवारी पहाटे सकाळी 7 वाजतापासून समस्या सुरू झाल्या.
Survey
✅ Thank you for completing the survey!
या समस्येबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, दर 30 मिनिटांनी 150 हून अधिक सातत्यपूर्ण अहवालांसह आलेख जवळजवळ चार तास लाल झाला आहे. एवढेच नाही तर, यूएस आणि इतर देशांतील इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनाही अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्लॅटफॉर्मनुसार, 77% हून अधिक वापरकर्त्यांना ॲप्लिकेशनमध्ये, 22% युजर्सना लॉगिनमध्ये आणि 11% युजर्सना त्यांचे कंटेंट अपलोड करताना समस्या येत आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की, नेहमीप्रमाणेच, X प्लॅटफॉर्मवर युजर्स तक्रारी करत आहेत, तर काही लोक याबद्दल मिम्स सादर करत आहेत. वापरकर्ते X वर या आउटेजसाठी फेसबुक, मेटा, इंस्टाग्राम आणि CEO मार्क झुकरबर्ग यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, मेटाने यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इंस्टाग्राम डाउनचे कारण संभवतः तांत्रिक त्रुटी किंवा बग आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे फीड रीफ्रेश करताना किंवा मॅसेजेस पाठवताना व्यत्यय येईल. तसेच, X वरील काही वापरकर्त्यांनी असेही म्हटले आहे की, त्यांनी समस्येचे निराकरण करण्यासाठी ऍप अनइंस्टॉल आणि रिइन्स्टॉल केले, यानंतर त्यांचे ऍप उत्तमरीत्या कार्य करत होते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile