SwaRail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ऍप, प्लॅटफॉर्म तिकिटापासून रिझर्वेशनसह मिळतील सर्व महत्त्वाच्या सुविधा

HIGHLIGHTS

भारतीय रेल्वेने एक नवीन Super App 'Swarail' लाँच केले आहे.

या ऍपवरून तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकिंग आणि PNR बद्दल माहिती इ. मिळेल.

स्वरेल ऍपमध्ये तुम्हाला पुढीलप्रमाणे सुविधा मिळणार आहे.

SwaRail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ऍप, प्लॅटफॉर्म तिकिटापासून रिझर्वेशनसह मिळतील सर्व महत्त्वाच्या सुविधा

भारतीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक नवीन ऍप, Super App ‘Swarail’ लाँच केले आहे. स्वरेल नावाचे एक नवीन सुपर ऍप लाँच केले आहे. या अ‍ॅपवर प्रवाशांना रेल्वेकडून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या सर्व सर्व्हिसेस मिळू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे एक ऑल-इन-वन ऍप आहे. या ऍपच्या मदतीने तुम्ही रिजर्वेशन आणि अन रिजर्व्ह्ड तिकिटे बुक करण्यास अखं असाल. या ऍपवरून तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकिंग आणि PNR बद्दल माहिती देखील मिळू शकते.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Tech Tips: तुमच्या Smartphone मधील वैयक्तिक डेटा कधीही चोरी होणार नाही, लक्षात ठेवा ‘हे’ महत्त्वाचे टिप्स

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, भारतीय रेल्वेचे हे नवीन सुपर ऍप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) ने विकसित केले आहे. सध्या ते प्ले स्टोअरवर बीटा प्रोग्राममध्ये उपलब्ध आहे. मात्र, या अ‍ॅपनंतर IRCTC अ‍ॅप बंद होईल की सुरु राहील याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.

swarail Super App

Super App SwaRail

भारतीय रेल्वेचे सुपर अ‍ॅप SwaRail हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे वापरकर्त्यांना एकाच अ‍ॅपवर सर्व सेवा मिळतील. सध्या रेल्वे सेवांसाठी वेगवेगळे अ‍ॅप्स आहेत, ज्यांना एका सुपर अ‍ॅपच्या मदतीने एकाच व्यासपीठावर आणले आहे. हे अगदी चीनच्या WeChat सारखे असेल, जिथे वापरकर्त्यांना एकाच मोबाइल ऍपमध्ये सर्व प्लॅटफॉर्मच्या सुविधा मिळतात. येथे युजर्स पेमेंट सर्व्हिस, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, व्हिडिओ प्लॅटफॉर्म आणि चित्रपट तिकीट बुकिंग इ. सेवांचा लाभ घेऊ शकतात.

रेल्वेच्या या सुपर अ‍ॅप अंतर्गत ‘या’ सुविधा उपलब्ध असतील

स्वरेल ऍपमध्ये तुम्हाला पुढीलप्रमाणे सुविधा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला आरक्षण तिकीट बुकिंग, अनारक्षित तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकिंग, PNR माहिती आणि फूड ऑर्डर आणि तक्रार इ. मिळतील. त्याबरोबरच, रेल्वेच्या या नवीन सुपर ऍप अंतर्गत, वापरकर्त्यांना ट्रॅव्हल असिस्टंट फीचर देखील मिळेल, जे रेल्वे प्रवाशांना सिंगल साइन-ऑन, ऑनबोर्डिंग आणि इतर अनेक सुविधा प्रदान करेल.

येथे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या ऍप्ससाठी वेगवेगळे लॉगिन ID आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. साध्या साइन इनच्या मदतीने, प्रवासी सहजपणे लॉगिन करू शकतील. लक्षात घ्या की, नव्या युजर्सना सुरुवातीला काही आवश्यक तपशील भरावे लागतील.

उपलब्धता

जर तुम्हीही रेल्वेचे हे सुपर ऍप डाउनलोड करण्याचा विचार करत असाल, तर ते सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, अँड्रॉइड आणि App स्टोअरवरील बीटा टेस्टिंग स्लॉट भरले आहेत. तथापि, ते स्टेबल व्हर्जनमध्ये कधी लाँच केले जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo