WhatsApp इंटरनॅशनल कॉल्सची ओळख कशी करावी ? ‘येथे’ रिपोर्ट करा

HIGHLIGHTS

भारतीय कॉल्स +91 ने सुरू होतात.

कॉल्सना बंदी घालण्यासाठी TRAI ने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.

इंटरनॅशनल कॉल्स 'अशा'प्रकारे ब्लॉक करा.

WhatsApp इंटरनॅशनल कॉल्सची ओळख कशी करावी ? ‘येथे’ रिपोर्ट करा

WhatsApp एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक युजरला माहिती आहे की, हा प्लॅटफॉर्म एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे.ऍप तुमच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीची नेहमीच काळजी घेतो. परंतु, सध्या व्हॉट्सऍपवरून फसवणूक आणि स्पॅम कॉल्स वाढत चालले आहे. यासोबतच, इंटरनॅशनल कॉल्स देखील येत असतात आणि या मार्फत युजर्सची वैयक्तिक माहिती देखील चोरली जाते.  

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

या लेखात आम्ही तुम्हाला इंटरनॅशनल कॉल्स कसे ओळखायचे आणि ते ब्लॉक कसे करायचे, याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. 

इंटरनॅशल कॉल्स कसे ओळखावे? 

भारतीय कॉल्स +91 ने सुरू होतात. हा भारताचा कंट्री कोड आहे. याशिवाय इतर कोणत्याही नंबरवरून कॉल सुरू होत असेल, तर समजा की तो आंतरराष्ट्रीय कॉल असू शकतो. लोक ट्विटरवर तक्रार करत आहेत की, त्यांना इथियोपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) यांसारख्या फॉरेन कंट्रीमधून कॉल येतात. 

या कॉल्सची रिपोर्ट कशी करावी? 

आजकाल पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशातून WhatsApp कॉल येत आहेत. या कॉल्सना बंदी घालण्यासाठी TRAI ने 18001110420 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. ज्यावर आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार करता येणार आहे. यानंतर ते नंबर्स नेहमीकरता ब्लॉक होतील. 

इंटरनॅशनल कॉल्स 'अशा'प्रकारे ब्लॉक करा. 

– सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.

– ज्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला होता त्यावर टॅप करा.

– वरच्या उजव्या कोपर्यात तीन ठिपके दिसतील. त्यावर क्लिक करा. 

– आता ब्लॉकचा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करून आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक केला जाऊ शकतो. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo