How to: WhatsApp स्पॅम मॅसेजेस आता लॉक स्क्रीनवरूनच होणार Block, जाणून घ्या कसे? Tech News 

How to: WhatsApp स्पॅम मॅसेजेस आता लॉक स्क्रीनवरूनच होणार Block, जाणून घ्या कसे? Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांच्या सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी नवनवीन फीचर्स सादर करतो.

WhatsApp ने आता एक नवीन अपडेट आणले आहे.

वापरकर्ते त्यांच्या लॉक-स्क्रीनवरूनच स्पॅम मॅसेज आणि कॉल ब्लॉक करू शकतात.

लोकप्रिय इन्स्टंट मॅसेज ऍप WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांच्या सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी नवनवीन फीचर्स आणत असते. वापरकर्त्यांची सिक्योरिटी आणि प्रायव्हसीसाठी पुन्हा एकदा नवीनतम अपडेट जारी केले आहे. सध्या घोटाळेबाज आजकाल निरपराध लोकांना लक्ष्य करण्यासाठी WhatsApp चा वापर करत आहेत. ते केवळ फिशिंग मॅसेज आणि लिंक्सद्वारे वापरकर्त्यांच्या डेटा चोरू शकतात आणि त्याचा गैरवापर देखील करू शकतात. याद्वारे फसवणुकीच्या घटना वाढतच चालले आहेत.

दरम्यान, फिशिंग मॅसेज आणि कॉलपासून आपल्या वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी, WhatsApp ने आता एक नवीन अपडेट आणले आहे. नवीनतम अपडेटनंतर वापरकर्ते त्यांच्या लॉक-स्क्रीनवरूनच स्पॅम मॅसेज आणि कॉल ब्लॉक करण्यास सक्षम असतील. कसे ते बघुयात-

WhatsApp-Feature-2024.
WhatsApp Update

WhatsApp Security Update

WhatsApp ने नवीनतम अपडेटद्वारे आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी ॲपमध्ये एक नवीन फिचर जोडले आहे. या फिचरद्वारे वापरकर्ते लॉक-स्क्रीनवरूनच स्पॅम मॅसेज आणि कॉल ब्लॉक करण्यास सक्षम असतील. यासाठी त्यांना त्यांचा फोन अनलॉक करून ॲप उघडण्याचीही आवश्यकता नाही.

लॉक-स्क्रीनवर अज्ञात नंबरवरून वापरकर्त्याला स्पॅम किंवा फिशिंग मॅसेजचे पॉप-अप दिसताच, ते त्या मॅसेजवर लॉन्ग प्रेस करून अनेक ऑप्शन्समध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. त्यानुसार वापरकर्त्याला थेट ब्लॉक करण्याचा पर्याय देखील असेल. लॉक स्क्रीनवरूनच स्पॅम मॅसेज किंवा कॉल ब्लॉक करण्याची स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

  • सर्वप्रथम तुम्हाला WhatsApp स्पॅम मॅसेजच्या पुढे दिसणाऱ्या ‘एरो’ चिन्हावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला ‘Block’ आणि ‘Reply’ असे दोन ऑप्शन्स दिसतील.
  • आता मॅसेज किंवा संपर्क ब्लॉक करण्यासाठी ‘Block’ वर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तो मॅसेज आणि संपर्क आपोआप ब्लॉक होईल. यासाठी तुम्हाला फोन अनलॉक करण्याचीही आवश्यकता नाही.

लक्षात घ्या की, हे ऑप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला नवीनतम WhatsApp आवृत्तीची गरज आहे. तुम्हाला यासाठी Google Play Store वरून लेटेस्ट WhatsApp वर्जन डाउनलोड करावे लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo