Apple FaceTime मध्ये आला हा खतरनाक बग

Updated on 30-Jan-2019
HIGHLIGHTS

जर तुम्ही FaceTime चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक खास माहिती आमच्याकडे आहे. या ऍप मध्ये कॉल रिसीव केल्याविना तुम्ही कांटेक्टड व्यक्तीचा कॉल ऐकू शकता. हि समस्या ऍप मधील एका बग मुळे येत आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • FaceTime ऍप मध्ये आला बग
  • iPhone चा ऍप आहे FaceTime
  • ऍपल ने बग असल्याचे सांगितले

ऍपल यूजर्सना सध्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. Apple च्या FaceTime ऍप मध्ये एक बग मुळे यूजर्स हैराण आहेत आणि हा बग असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. या बग मुळे येणारी अडचण अशी की जर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही कोणाला कॉल केला तर कॉल रिसीव केल्या विना पण दुसऱ्या यूजरचा कॉल ऐकायला येतो. असे पण बोलले जात आहे कि या बग मुळे FaceTime कॉल रिसीवरच्या फोन कॉलला एका माइक्रोफोन मध्ये चेंज करतो.

यूजर्सची प्राइवसी धोक्यात

बग मुळे यूजर्सची प्राइवेसी आणि सिक्युरिटी पण धोक्यात आली आहे. बग आल्यामुळे यूजर्सची खाजगी माहिती पण सार्वजनिक होत आहे, तेही त्याच्या मर्जी विना. त्यामुळे बग च्या या समस्येमुळे FaceTime च्या यूजर्सचा विश्वास पण ऍपलच्या या ऍप वरून कमी होत आहे. एक खास बाब म्हणजे इनकमिंग कॉल रिसीव करायचा नसल्यास जेव्हा यूजर पवार बटण दाबतो, तेव्हा फोन वर कॉल करणाऱ्याचा वीडियो समोर येतो.

ऍपल आहे शांत

जरी Apple ने हा बग असल्याचे मान्य केले असले तर अजून या बगबद्दल कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच रिपोर्ट्स नुसार Apple ने सांगितले होते कि ते हि समस्या दूर करण्यासाठी लवकरच यूजर्स साठी एक अपडेट आणतील जेणेकरून त्यांची हि समस्या दूर होईल.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :