WhatsApp ने काही काळापूर्वी यूजर प्रायव्हसी लक्षात घेऊन एक फीचर आणले होते, ते म्हणजे 'डिलीट फॉर एव्हरीवन' फीचर होय. व्हॉट्सऍप आता वापरकर्त्यांना पाठवलेले संदेश 2 दिवस आणि 12 तासांच्या आत हटवण्याची परवानगी देते. हे फीचर वापरकर्त्यांना तासांनंतरही चुकून पाठवलेले चॅट डिलीट करण्यास अनुमती देतो. डिलीट झालेले मॅसेजेस नंतर वाचता येत नाही.
Survey
✅ Thank you for completing the survey!
हे फिचर उपयुक्त असले तरी, मॅसेज कोणता होता आणि तो का काढला गेला याची उत्सुकता प्राप्तकर्त्यास सोडते. मात्र, अशा काही युक्त्या आहेत ज्यांच्या मदतीने हटवलेले व्हॉट्सऍप मॅसेजेस वाचले जाऊ शकतात.
तुमच्या WhatsApp डेटाचा नियमित बॅकअप घ्या आणि पूर्वीच्या बॅकअपमधून मेसेज रिस्टोअर करा. हे करण्यासाठी, WhatsApp सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप वर जा. आता जुना बॅकअप शोधा ज्यामध्ये हटवलेले मॅसेज आहेत. मात्र, असे केल्याने तुम्हाला ऍप हटवावे लागेल आणि पुन्हा लॉगिन करावे लागेल आणि बॅकअप चालवावा लागेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile