Airtel 5G Plans : नवीन प्लॅन्समध्ये अमर्यादित डेटासह OTT सब्स्क्रिप्शन मोफत

Airtel 5G Plans : नवीन प्लॅन्समध्ये अमर्यादित डेटासह OTT सब्स्क्रिप्शन मोफत
HIGHLIGHTS

कंपनीने काही नवीन 5G प्लॅन सादर केले आहेत.

5G अपात्र युजर्ससाठी प्लॅनमध्ये वेगळ्या सुविधा

यामध्ये तुम्हाला OTT सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

सध्या देशभरात सर्वत्र Airtel 5Gचा विस्तार होत आहे. दरम्यान, कंपनीने काही नवीन 5G प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅन्समध्ये अमर्यादित 5G डेटा उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या प्लॅन्समध्ये तुम्हाला OTT सब्स्क्रिप्शन देखील मिळेल. जर तुम्ही देखील Airtel 5G वापरत असाल तर नवीन प्लॅनबद्दल सविस्तर तपशील जाणून घेऊयात- 

Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन 

Airtel चा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग सपोर्ट  देखील आहे. विशेष म्हणजे यात अमर्यादित 5G इंटरनेट डेटा आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. युजर्सना Disney + Hotstar मोबाईल, Xtreme ऍप बेनिफिट्स, विंक सबस्क्रिप्शनचे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. 

या प्लॅनमध्ये ज्या वापरकर्त्यांना अद्याप 5G सुविधा मिळालेली नाही, त्यांना अमर्यादित 4G डेटासह 3 GB डेली डेटा कॅप मिळेल.   

Airtel चा 699 रुपयांचा प्लॅन 

यात 56 दिवसांची वैधता मिळणार आहे. बेनिफिट म्हणून यात कॉलिंग आणि 100 SMS दररोज देत आहे. 5G क्षेत्रात नसलेल्या युजर्स प्लॅनमध्ये दररोज 3GB 4G डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये Amazon Prime चे 56 दिवसांचे सबस्क्रिप्शन, Xstream ऍप आणि Wynk सबस्क्रिप्शन दिले जाते. 

Airtel चा 839 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात अमर्यादित 5G इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. याशिवाय, वरील प्लॅनप्रमाणे वापरकर्त्यांना Disney + Hotstar मोबाइल, एक्सस्ट्रीम ऍप, रिवॉर्ड्स मिनी सबस्क्रिप्शन आणि विंक म्युझिकचे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळते. 

प्लॅनमध्ये, ज्या युजर्सना अजूनही 5G वर प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी 2GB च्या दैनिक कॅपसह अमर्यादित 4G डेटा उपलब्ध आहे. 

Airtel चा 999 रुपयांचा प्लॅन

  हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित 5G इंटरनेट डेटा, दररोज 100SMS मिळणार आहेत. वापरकर्त्यांना 84 दिवसांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप, एक्स्ट्रीम ऍप बेनिफिट्स, विंक सबस्क्रिप्शन, रिवॉर्ड्स मिनी सबस्क्रिप्शन यांसारख्या अनेक सुविधा मिळतात. Airtel 5G क्षेत्रात नसलेले वापरकर्ते 2.5GB च्या डेली डेटा कॅपसह अमर्यादित 4G डेटाचा आनंद घेऊ शकतात.

Airtel चा 3,359 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन वार्षिक म्हणजेच संपूर्ण एका वर्षाच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा, कॉलिंग आणि दररोज 100 SMS ऑफर करतो. यात 1 वर्षाचे Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन, Apollo 24X7 बेनिफिट्स आणि Wynk सबस्क्रिप्शन देखील आहे. 5G नसलेल्या क्षेत्रात हा प्लॅन 2.5GB च्या दैनिक मर्यादेसह अमर्यादित 4G डेटा ऑफर करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo