JIOने लाँच केले 5 नवीन प्रीपेड प्लॅन्स, नव्या प्लॅन्समध्ये विशेष सबस्क्रिप्शन उपलब्ध

JIOने लाँच केले 5 नवीन प्रीपेड प्लॅन्स, नव्या प्लॅन्समध्ये विशेष सबस्क्रिप्शन उपलब्ध
HIGHLIGHTS

JIOने एकासोबत 5 नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत.

या सर्व प्लॅनमध्ये Jio Saavn Pro चे सब्स्क्रिप्शन दिले जात आहे.

JioSaavn Pro सबस्क्रिप्शनची सुविधा असलेले प्लॅन 269 रुपयांपासून सुरू होतात.

JIO युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. JIOने एकासोबत 5 नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. खरं तर, हे प्लॅन्स JIO ने म्युझिक लव्हर्ससाठी लाँच केले आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही. या सर्व प्लॅनमध्ये Jio Saavn Pro चे सब्स्क्रिप्शन दिले जात आहे. बघुयात सर्व प्लॅन्सची किंमत आणि बेनिफिट्स. 

JIOचा 269 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 

JioSaavn Pro सबस्क्रिप्शनची सुविधा असलेले प्लॅन 269 रुपयांपासून सुरू होतात. या प्लॅनसह दररोज 1.5GB डेटा आणि 28 दिवसांची वैधता आहे. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMSची सुविधाही यात दिली जात आहे.

JIOचा 529 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 

या प्लॅनमध्ये एकूण ​​वैधता 56 दिवसांची आहे. यामध्येही दररोज 1.5GB डेटा दिला जाईल. यासोबतच ऍड फ्री म्युझिक आणि अमर्यादित जिओट्यून देण्यात येणार आहे. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चे फायदेही आहेत.

JIOचा 739 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 

739 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये वरील प्लॅनप्रमाणेच फायदे आहेत. 1.5GB डेटा, ऍड फ्री म्युझिक जिओ ट्यून, अमर्यादित कॉलिंग आणि SMSचा लाभ मिळेल. 

JIOचा 589 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 

यात 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा दिला जात आहे. जाहिरातमुक्त म्युझिक आणि अमर्यादित Jiotune, अमर्यादित कॉलिंग आणि SMSचा लाभ आहे.

JIOचा 789 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 

यामध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह 2 GB डेटासह ऍड फ्री मूक्सिक, Jiotune, अमर्यादित कॉलिंग आणि SMS चा लाभ आहे. म्हणजेच, या प्लॅनमध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे समान फायदे आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo