डेली डेटा लिमिट संपली? बघा Jioचे 4 आकर्षक Data Add on प्लॅन्स

डेली डेटा लिमिट संपली? बघा Jioचे 4 आकर्षक Data Add on प्लॅन्स
HIGHLIGHTS

Jioचे 4 आकर्षक Data Add on प्लॅन्स

केवळ 15 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळेल 1 GB डेटा.

अतिरिक्त इंटरनेटची गरज सहज पूर्ण होईल.

आज इंटरनेट ही जगाची खास गरज बनली आहे. त्याशिवाय आपली अनेक कामे होत नाही किंवा अपूर्ण राहतात. कोरोना महामारीनंतर लोक नोकरी, शिक्षण किंवा इतर कामासाठी मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, डेली डेटा लिमिट संपल्यानंतर कामांमध्ये स्लो स्पीड इंटरनेट किंवा अनेक समस्या निर्माण होतात. पण काळजी करू नका, या समस्येवर निवारण म्हणून या लेखामध्ये आज आम्ही तुम्हाला जिओच्या काही खास Data Add on प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. 
देशात अशा वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे, ज्यांना दररोजची डेटा मर्यादा संपल्याने अनेकदा त्रास होतो. जर तुम्ही देखील याच समस्येने त्रस्त असाल तर आजच तुम्ही तुमच्या फोनमधील Jio च्या  Data Add onप्लॅन्सचा रिचार्ज करा. तुमच्या मोबाईलमध्ये हे रिचार्ज केल्यानंतर, तुम्ही तुमची इंटरनेटची अतिरिक्त गरज पूर्ण करू शकता. याशिवाय, हे रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय इंटरनेटचा आनंद घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया या रिचार्ज प्लॅन्सबद्दल… 

Jioचा 15 रुपयांचा Data Add on प्लॅन

इंटरनेट वापरत असताना तुमची दैनिक डेटा मर्यादा संपली आणि तुम्हाला मर्यादित प्रमाणात इंटरनेटची गरज आहे, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फोनमध्ये Jio चा हा रिचार्ज करू शकता. या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत केवळ  15 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 1GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता तुमच्या ऍक्टिव्ह व्हॅलिडिटी बेस प्लॅनपर्यंत असेल.

Jioचा 25 रुपयांचा Data Add on प्लॅन

डेली डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Jio चा हा रिचार्ज देखील करू शकता. यामध्ये तुम्हाला  एकूण 2GB डेटा मिळेल.या प्लॅनची वैधता तुमच्या ऍक्टिव्ह व्हॅलिडिटी बेस प्लॅनपर्यंत असेल.

Jioचा 61 रुपयांचा Data Add on प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 6GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता तुमच्या ऍक्टिव्ह व्हॅलिडिटी बेस प्लॅनपर्यंत असेल. या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत एकूण 61 रुपये आहे.

 Jioचा 121 रुपयांचा Data Add on प्लॅन

डेली डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला अधिक इंटरनेटची आवश्यकता असल्यास हा रिचार्ज देखील करता येईल. यामध्ये तुम्हाला 12 GB डेटा मिळेल. त्याबरोबरच, या प्लॅनची वैधता तुमच्या ऍक्टिव्ह व्हॅलिडिटी बेस प्लॅनपर्यंत कायम राहील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo