BSNLच्या ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये महिन्याभराच्या वैधतेसह मिळतील अनेक फायदे, वाचा सविस्तर

BSNLच्या ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये महिन्याभराच्या वैधतेसह मिळतील अनेक फायदे, वाचा सविस्तर
HIGHLIGHTS

महिन्याभराच्या वैधतेसह BSNLचे आकर्षक रिचार्ज प्लॅन्स.

200 रुपयांपेक्षाही स्वस्त प्लॅन्समध्ये मिळतील अनेक फायदे.

इंटरनेट डेटासह व्हॉइस कॉलिंगचीही सुविधा.

BSNLच्या 'या' रिचार्ज प्लॅनमध्ये महिन्याभराच्या वैधतेसह मिळतील अनेक फायदे, वाचा सविस्तर स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीमधील BSNLचे  काही आकर्षक रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. चला तर जाणून घेऊयात या आकर्षक रिचार्ज प्लॅन्सबद्दल…

आज आम्ही तुम्हाला BSNL च्या काही आकर्षक रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कमी खर्चात अनेक फायदे मिळतील. त्याबरोबरच या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एक महिन्याची वैधता देखील मिळेल. काही काळापूर्वी BSNL ने परवडणाऱ्या दरात अनेक रिचार्ज प्लॅन लाँच केले होते. हे प्लॅन लाँच झाल्यानंतर अनेक ग्राहक BSNL मध्ये सामील होत आहेत.
तुम्ही जर BSNLचे ग्राहक असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. या लेखात आपण एका महिन्याच्या वैधतेसह BSNLच्या विशेष रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.BSNLच्या या प्लॅन्सची किंमत 200 रुपयांपेक्षाही कमी आहे. या प्लॅन्समध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी डेटा लिमिट आणि त्याबरोबरच कॉलिंगची सुविधाही मिळेल. स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीमधील हे रिचार्ज

प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. चला तर जाणून घेऊयात या आकर्षक रिचार्ज प्लॅन्सबद्दल…

BSNLचा 153 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNLच्या या प्लॅनची किंमत 153 रुपये आहे. हा प्लॅन एकूण 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. याशिवाय, यामध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज 1GB डेटा मिळणार आहे. त्याबरोरबच, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधादेखील  मिळणार आहे.

BSNLचा 118 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNLच्या या प्लॅनची किंमत 118 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 26 दिवसांची वैधता मिळेल. याशिवाय, यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 0.5GB डेटा मिळतो. त्याबरोबरच या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधादेखील मिळणार आहे.

BSNLचा 187 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही जास्त दैनंदिन डेटा मर्यादेसह चांगला BSNL प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 187 रुपये आहे. हा प्लॅन एकूण 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2GB डेटा देखील मिळतो. तसेच, यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळेल.
महिन्याभराच्या वैधतेसह BSNLचे आकर्षक रिचार्ज प्लॅन्स. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo