Airtel 5G : डेली 2GB डेटासह येणारे स्वस्त प्लॅन्स, अनेक महत्त्वाचे बेनिफिट्स उपलब्ध

Airtel 5G : डेली 2GB डेटासह येणारे स्वस्त प्लॅन्स, अनेक महत्त्वाचे बेनिफिट्स उपलब्ध
HIGHLIGHTS

AIRTEL कंपनीचे डेली 2GB डेटासह येणारे प्लॅन्स

सुरुवातीच्या प्लॅनची किंमत 319 रुपये

पात्र ग्राहकांना 5G नेटवर्कचा लाभ घेता येईल.

Airtel सध्या भारतात आपल्या 5G नेटवर्कचा विस्तार झपाट्याने करत आहे. AIRTEL कंपनी आपल्या ग्राहकांच्या प्रत्येक मागणीची काळजी घेत, नवनवीन प्लॅन्स सादर करत असते. यामध्ये दररोज भरपूर डेटा देणारे प्लॅन्स देखील सामील आहेत. घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरपूर डेटाची गरज असते. चला तर बघुयात कंपनीचे डेली 2GB डेटासह येणारे प्लॅन्स- 

Airtel चा 319 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनची वैधता एका महिन्याची आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMSचा दररोज लाभ मिळतो. पात्र ग्राहकांना 5G नेटवर्कचा लाभ या प्लॅनसह घेता येणार आहे. अतिरिक्त लाभांमध्ये यात FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्युझिकचा मोफत लाभ मिळेल.  

Airtel चा 395 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 28 दिवसाची वैधता मिळेल. त्यासोबतच, 2GB डेटाचा दररोज लाभ घेता येईल. या प्लॅनसह तुम्ही अमर्यादित कॉलिंग करू शकता आणि दररोज 100 SMSचा लाभ घेऊ शकता. वरील प्लॅनप्रमाणे यामध्ये देखील पात्र ग्राहकांना 5G नेटवर्कचा लाभ घेता येईल. यात Xtreme ऍपचे सब्स्क्रिप्शनदेखील उपलब्ध आहे. फ्री हॅलो ट्यून, विंक म्युझिकचा मोफत लाभ मिळेल आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आहे. 

Airtel चा 549 रुपयांचा प्लॅन 

Airtel च्या 549 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2GB डेटाचा लाभ मिळतो. हा प्लॅन एकूण 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच, वरील सर्व प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स यात तुम्हाला मिळतील. म्हणजेच अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS येथे तुम्हाला मिळणार आहेत. यातसुद्धा Xtreme ऍपचे सब्स्क्रिप्शन तुम्हाला मिळणार आहे. तसेच, अपोलो 24/7 सर्कल आणि विंक म्युझिकचे बेनिफिट मिळेल. तसेच, या प्लॅनमध्ये देखील पात्र ग्राहकांना 5G नेटवर्कचा लाभ घेता येणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo